BHEL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BHEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

BHEL Recruitment 2025: केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीएचईएलमध्ये सध्या भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायजर ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (BHEL Recruitment)

बीएचईएलमधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये ४०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमा केलेले असावा. (BHEL Recruitment 2025)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २७ ते १९ वर्षापेक्षा जास्त नसावी. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या भरती मोहिमेत इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर शुल्क भरायचे आहे.सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०७२ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४७२ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT