Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Recruitment 2024: बँकेत नोकरीची मोठी संधी ; ९००० हून अधिक पदे, IBPS द्वारे भरती, शेवटची तारीख कधी?

IBPS Bank Recruitment 2024: बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आंनदाची बातमी आहे. आयबीपीएस इन्स्ट्यूटद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण बँकासाठी ही भरती राबवण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये एकूण ९ हजारहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ७ जूनपासूनच सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ग्रामीण बँकासाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पोर्सोनेल सिलेक्शनने ही भरती प्रक्रिया राबवली आहे. या नोकरीसाठी एकूण ९९९५ पदे भरती जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. २७ जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ibps.in या बेवसाइटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे. देशातील अनेक ग्रामीण बँकेसाठी ही भरती राबवली जात आहे. या नोकरीसाठी तुम्हाला चांगले मासिक वेतनदेखील देण्यात येईल. या भरतीसाठी तुम्हाला परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे. त्यानंतरच उमेदवाराची निवड केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.

ही भरती वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणार आहे. सीए, बँक अधिकारी, पीओ या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT