Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा?

Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. तब्बत ६०० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे. (Bank Jobs)

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.

या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सूट दिली गेली आहे.याबाबत सर्व माहिती तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन घेऊ शकतात. (Bank Of Maharashtra Job)

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.बँक ऑफ इंडियातील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९००० रुपयांची स्टायपेंड दिली जाणार आहे. त्याचसोबत त्यांना ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Bank Of Maharashtra Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उर्वरित नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आज मतदान

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

SCROLL FOR NEXT