Bank Of Baroda Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. फायनान्स, डिजिटल विभागात ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची इच्छा असे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामध्ये कॉन्ट्रॅक्ट पोस्ट्स (मॅनेजर आणि इतर पदे) साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ५९२ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तरुणांनी अर्ज करावेत. (Bank Of Baroda Recruitment)

कॉन्ट्रॅक्ट पोस्ट पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. (CA/CMA/CFA/CS)/B.E/B.Tech/M.Tech/M.E/MCA पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. याचसोबत उमेदवाराकडे अनुभव असायला हवा. (Bank Of Baroda Job)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी फायनान्स विभाग, एमएसएमई, डिजिटल विभागात पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ६०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. मॅनेजर, डिपार्टमेंट हेड, रिलेशनशिप मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT