Bank Of Baroda Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Of Baroda Recruitment: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदामध्ये या पदांसाठी सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी आणि १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी ७ वी, १० वी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये BSVS केंद्रासाठी वॉचमन आणि गार्डनर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामध्ये वॉचमन आणि गार्डनर पदे भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी ६ हजार रुपये मासिक वेतन आणि ५०० रुपये प्रवास भत्ता दिला दाणार आहे.

सवाई माधवपूर येथील ब्रँचमध्ये ही पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही तुमचा अर्ज आणि त्यावर स्वाक्षरी करुन हार्ड कॉपी ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहे. ८ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफिस, सवाई माधवपूर, रणथंबोर रोड येथे हा अर्ज पाठवायचा आहे.

बँक ऑफ बडोदासोबत देशातील नॅशनल बँकेत भरती जाहीर केली आहे. आयबीपीएसद्वारे ही भरती केली जाणार आहे. यामध्ये लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT