Union Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Union Bank Recruitment: यूनियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १५०० रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूनियन बँकेत सध्या भरती सुरु आहे. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. बँकेत ऑफिसर पदावर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. त्याचसोबत निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगारदेखील मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये १५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Union Bank Recruitment)

विविध राज्यात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि ग्रुप डिस्कशनद्वारे केली जाणार आहे. ऑनलाइन परिक्षेत १५५ प्रश्न विचारले जाणार आहे. २०० गुणांसाठी ही टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे.

(bank Job)

नोकरीसाठी अर्ज कसा करावा? (Union Bank Job Recruitment)

  • या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने unionbankofindia.co.in या वेबसाइटवर क्लिक करा. त्यानंतर रिक्रूटमेंटवर जाऊन भरती सेक्शनवर क्लिक करा.

  • यानंतर Click Here To Apply वर क्लिक करा.

  • यानंतर Click Here To new Registration वर क्लिक करा. यानंतर तुम्ही सर्व माहिती, फोटो अपलोड करा.

  • यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांनाही म्हटलो मी इकडे आलो, तुमचं तिकडे काय काम ? - रामदास आठवले

Deepika- Ranveer Daughter Dua: लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाले दीपिका अन् रणवीर; एअरपोर्टवरचा VIDEO व्हायरल

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Winter Season: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

SCROLL FOR NEXT