Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Job: पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी; महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra State Co-Operative Bank Job: बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ७५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Bank Jobs)

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.

ट्रेनी ज्युनिअर आणि ट्रेनी असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ७५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील या भरतीसाठी ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ११७० रुपये फी भरायची आहे तर ट्रेनी असोसिएट पदासाठी ११८० रुपये शुल्क भरायचे आहे. २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तुम्ही www.mscbank.com या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती वाचू शकतात. (Maharashtra State Co-Operative Bank Job)

महावितरणमध्ये नोकरी

सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण म्हणजेच महावितरण कार्यालयात भरती सुरु आहे. ५६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. वर्धा येथील कार्यालयात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हीही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

Maharashtra News Live Updates: निलेश राणे उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

VIDEO : कुर्ला, चुनाभट्टीमध्ये भाजपला धक्का; 1 हजार कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Sharp Eyes: तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

SCROLL FOR NEXT