NTPC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC मध्ये 'या' पदांसाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करावा?

NTPC Recruitment 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
NTPC Job
NTPC JobSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.एनटीपीसीमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (बायोमास) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

NTPC Job
Government Job: इंजिनियर झालात? भारत सरकारच्या या कंपनीत सुरु आहे भरती; मिळणार १२०००० पगार; अर्ज कसा करायचा?

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीएससी अॅग्रीकल्चर पदवी प्राप्त केलेली असावी. त्यामुळे ज्या उमेदवारांनी कृषी विषयात पदवी प्राप्त केलेली असेल त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी ५० जागा रिक्त आहेत. यामध्ये २२ जागा सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे. तर ईडब्ल्यूएससाठी ५ पदे रिक्त आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी १३ पदे तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी ३ जागा रिक्त आहेत. (NTPC Recruitment)

NTPC Job
Bank Job: नोकरी शोधताय? पंजाब अँड सिंध बँकेत भरती सुरु; पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला एनटीपीसीची अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर जायचे आहे. त्यानंतर होमपेजवर भरतीबाबत लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे नवीन पेजवर जाऊन तुम्ही स्वतः ला रजिस्टर करु शकतात.लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करु शकतात. तुम्ही या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

NTPC Job
Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; महिना ११२००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com