Canara Bank Job Saam Tv
naukri-job-news

Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Canara Bank Recruitment: तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. कॅनरा बँकेत तब्बल ३००० पदांसाठी भरती सुरु आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.कॅनरा बँकेत सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँकेत अप्रेटिंस पदासाठी भरती सुरु आहे. कॅनरा बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदासाठी नोकरीसाठी अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीबाबत सर्व माहिती canarabank.com वर देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. मुदतीनंतर अर्जप्रक्रिया बंद होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Canara Bank Job)

कॅनरा बँकेत तब्बल ३००० पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यामुळे या नोकरीसाठी अर्ज करावेत.canarabank.com या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचा.

या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराने कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम www.nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्वतः ला रजिस्टर करा वे लागेल. यानंतर तुम्हाला बँकेच्या नोकरीसाठी अर्ज करता येईल. (Bank Jobs)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

सध्या कॅनेरा बँकेसोबत स्टेट बँके ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती सुरु आहे. १००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात. (SBI Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT