सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बीईसीआयएल कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडियाने विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.
बीईसीआयएलमध्य कन्सल्टंट, कटेंट राइटर, क्रिएटिव्ह कंटेट राइटर, व्हिडिओ एडिटर अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बीईसीआयएलमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही तुमचा अर्ज आणि व आवश्यक कागदपत्रे रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२४ आहे.
या नोकरीसाठी एकूण २४ पदांवर भरती केली जाणार आहे. यातील १४ पदे ही रिसर्च असोसिएट आणि कंटेट रायटर पदासाठी आहेत. १२ पदे कंसल्टंट/क्रिएटिव्ह रॉयटर / ग्राफिक डिझाइर / व्हिडिओ एडिटर पदासाठी आहे. दोन पदे ही कंसल्टंट पदासाठी आहेत. १ पद डिजिटल मीडिया मार्केटिंग प्रिसिंपल कंसल्टंट पदासाठी आहेत.
या नोकरीसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. रिसर्च असोसिएट आणि कंटेट रॉयटर पदासाठी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. य नोकरीसाठी उमेदवारांकडे दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. मास कम्युनिकेशन पदवी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठ रिसर्च असोसिएट पदासाठी उमेदवारांना २५००० ते ४०००० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट कंसल्टंट पदासाठी ४०,००० ते ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. कंसल्टंट पदासाठी ६०,००० ते ८०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. सिनियर कंसल्टंट आणि प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी १०००० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला becil.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या साइटवर तुम्हाला फॉर्म दिला आहे. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरुन तो फॉर्म आणि कागदपत्रे ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड, बेसिल भवन, सी-५६/ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१३०७ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.