रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेची मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. रेल्वे भर्ती बोर्डतर्फे नॉन- टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीसाठी ही भरती आहे.
R रेल्वेची एकूण 8113 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. 14 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
RRB NTPC या पदासाठी ही भरती सुरू आहे. ज्यामध्ये तिकीट पर्यवेक्षक पदासाठी 1736 उमेदवार, स्टेशन मास्टर पदासाठी 994 उमेदवार , गुड्स टरने मॅनेजर 3144 उमेदवार , कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक 1507 उमेदवार आणि वरिष्ठ लिपिक टंकलेखक पदासाठी 732 उमेदवारांची निवड करण्यात येईल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. पात्र उमेदवारास वयाची अट असणार आहे. 18 ते 36 वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.in. ला भेट द्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.