AIASL Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी;AIASL मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; पगार किती? जाणून घ्या

AIASL Recruitment 2024: तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एआय एअरपोर्ट सर्विसेज लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. हँडीमॅन आणि यूटिलिटी एजेंट्स पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

एआर एअरपोर्ट सर्व्हिसेजमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (AIASL Recruitment)

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेज लिमिटेडमध्ये १४२ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यातील हँडीमॅन पदासाठी ११२ पदे रिक्त आहेत. तर यूटिलिटी एजेंट्स पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. यूटिलिटी एजेंट्स पदासाठी उमेदवाराकडे मोटर वाहन चालवण्याचे लायसन्य असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्ष असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.(Government Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार होते. या नोकरीसाठी हँडीमॅन पदासाठी उमेदवारांना २२५३० रुपये वेतन मिळणार आहे तर यूटिलिटी एजेंट्स पदासाठी २४९६० रुपये वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

SCROLL FOR NEXT