AAI Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Airport Job: एअरपोर्टवर नोकरी करण्याची संधी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला NATS पोर्टल nats.education.gov.in या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. (Airport Authority Of India Recruitment)

एएआयच्या च्या भरती मोहिमेद्वारे १३५ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यातील ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ४५ पदे रिक्त आहेत. तर डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ५० जागा रिक्त आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ४० जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात ४ किंवा तीन वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत आयटीआय अप्रेंटिस पदासाठी आयटीआय/NCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वयोगट २६ वर्ष असावा. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. कागदपत्रे पडताळणीनंतर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीच्या मुलाखतीबाबत आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ई मेलवर माहिती देण्यात येणार आहे. (Airport Jobs)

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तर आयटीआय अप्रेंटिस पदासाठी ९००० रुपये वेतन दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrigonda News : आघाडीची बिघाडी थांबेना; श्रीगोंदाच्या जागेवरून ठाकरे आणि पवार गटात रस्सीखेच

Bigg Boss 18: 'नहीं हो रही है हिंदी में बात...' भाषेवरून बिग बॉससोबत सदस्याची तू तू मैं मैं

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

हाताची कोपरं काळीकुट्टं झालीयेत? घराच्या घरी 'या' टीप्सने करा काळेपणा दूर

Sangli News: अय्यो! ओढ्याच्या पाण्यात वाहून आल्या ५०० च्या नोटा, आटपाडीकरांना लॉटरीच लागली; पैसे गोळा करायला तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT