Rana Kapoor saam tv
देश विदेश

Yes Bank Scam: येस बँक घाेटाळ्याचे प्रमुख सूत्रधार राणा कपूर यांना जामीन मंजूर

हा खटला ११ मार्चला सुनावणीसाठी ठेवला आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मुंबईच्या सत्र न्यायालयाने आज येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर (Rana Kapoor) यांना बँकेचे ३०० कोटींहून अधिक रकमेच्या नुकसानाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन (bail) मंजूर केला. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत विशेष न्यायालयाने कपूर (former MD and CEO of YES Bank Rana Kapoor) यांस काही अटींवर जामीन मंजूर केला.

कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही असे न्यायालयाने नमूद करीत त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे निर्देश दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी कपूर यांच्या जामीन अर्जावर सक्त वसूली संचालनालयाकडून (Enforcement Directorate) उत्तर मागितले होते.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर राणा कपूरने ट्रायल कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. राणा कपूरचा गुन्ह्यातील सहभाग महत्त्वाचा असल्याच्या कारणावरून ईडीने या अर्जाला विरोध केला होता. दरम्यान न्यायमूर्ती एमके ओहरी यांच्या खंडपीठाने ईडीकडून म्हणणे मागितले असून अतिरिक्त सुनावणीसाठी हा खटला ११ मार्चला सुनावणीसाठी ठेवला आहे.

Edited by: Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT