पुणे: कुलदैवत निमगाव खंडोबा बैलगाडा शर्यतीच्या घाटात सकाळपासुन बैलगाडा शर्यती उत्साहात सुरु असुन आज दुपारी या बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे घोडीवर टाप टाकणार अशी चर्चा होती. मग काय कोल्हेनी शब्द पाळला आणि थेट घाटात बारीसमोर घोडी पळवली. यांने अमोल कोल्हेंनी प्रचारा दरम्यान दिलेला शब्द पाळला असल्याचे म्हणावे लागेल. डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) भिर्रर्रच्या शर्यतीत घोडीवर टाप मारणाल्याने नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. (Amol Kolhe Latest Video)
दरम्यान मागच्या अनेक वर्षापासून बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरु झाली आहे. ती शर्यत सुरु होण्याची राष्ट्रवादीचे खासदरा अमोल कोल्हे यांनी संसदेत कायम मुद्दा उचलून धरला होता. शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनीही शर्यत सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि त्यानी अमोल कोल्हेंना आव्हान दिले होते की त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि बारीमध्ये घोडीवर बसावे. आज तोच शब्द अमोल कोल्हेंनी पाळलेला पाहायला मिळाले. १३ -१४ सेकंदात ही बारी अमोल कोल्हेंनी मारली आहे.
राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असतात. पण आज त्यांनी पुण्याच्या निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोड्यावर मांड ठोकली. २०१९ च्या निवडणुकीत कोल्हे यांनी भर सभेत निवडून आल्यानंतर घाटात बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार असल्याचं सांगितलं होतं. यावरून त्यांचे विरोधक आणि सेनेचे माजी आमदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलेलं चॅलेंज आज त्यांनी पूर्ण केलं आहे. सध्या कोल्हेंच्या या घोडेस्वारीची चर्चा आहे. शब्द पूर्ण केला...सर्वांच्या साक्षीने पूर्ण केला..बारी मारली! असं ठसक्यात कोल्हेंनी सांगितलं. आणि शर्यतीसाठी उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.