सातारा : श्री क्षेत्र सज्जनगड (sajjangad) येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या (samarth ramdas) वतीने गुरुवारपासून (ता.१७) २५ फेब्रुवारीपर्यंत दासनवमी उत्सव (ramdas navami 2022) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दासबोध पारायण प्रवचन व कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. (satara latest marathi news)
दासनवमी (ramdas navami) उत्सव कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत दासबोध (dasbodh) पारायण वाचन होणार असून त्यासाठी नितीनबुवा जोशी रामदासी व रसिका ताई ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण २५ फेब्रुवारी अखेर संपन्न होणार आहे. २५ फेब्रवारीलाच दासबोध पारायणाची सांगता आणि श्री दासनवमीचा महाप्रसाद वितरण होणार आहे.
दरम्यान १७ फेब्रुवारी पासून सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी यांची दोन दिवस व शनिवार (ता. १९) पासून श्री गुरूनाथ महाराज कोटणीस यांची सहा दिवस प्रवचने सादर होणार आहेत. १७ ते २३ फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी चार ते सहा या वेळेत समर्थभक्त मकरंद बुवा रामदासी हे कीर्तन सेवा करणार आहेत. किर्तन सेवेमध्ये मकरंद बुवा यांना संवादिनी साथ सुशील गदरे व तबला साथ विश्वास जोशी यांची लाभणार आहे.
मागील दाेन वर्षे कोविडच्या (covid19) महामारीमुळे यावर्षीही विविध मान्यवर गायक गायिकांची होणारी संगीत सेवा या वर्षी होणार नाही अशी माहिती (satara) समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा पुरोहित रामदासी यांनी दिली आहे .
समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दासनवमी महोत्सवात सर्व समर्थ भक्तांनी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस ,कार्याध्यक्ष ऍड. डी.वी.देशपांडे ,खजिनदार समर्थभक्त अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा पुरोहित रामदासी यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.