कराड : शिवसेनेचे कार्यकर्ते अशोक भावके (ashok bhavke) यांचे अपघाती निधन झाल्याने कराड तालुक्यात शाेककळा पसरली आहे. भावके यांच्या जून्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील धाडसाबद्दल घाेगाव ग्रामस्थ व्यक्त हाेत अश्रुंना वाट माेकळी करुन देताहेत. (shivsena leader ashok bhavke passes away in road accident)
सन १९९५ विधानसभा निवडणुकीत अशोक भावके (ashok bhavke) यांच नाव सगळ्यांना माहिती झालं. उंडाळे भागासह तालुक्यात आमदार विलासराव पाटील उंडाळकर (vilasrao patil undalkar) यांचा दरारा होता. त्यावेळी तालुक्यातील अनेक मातब्बर काकांच्या विरोधात उभं राहायला तयार व्हायचे नाहीत. त्या काळात घोगाव सारख्या दुर्गम गावातील तरुण अशोक भावके शिवसेनेच्या (shivsena) धनुष्य चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
निवडणुकीचा निकाल सर्वांना माहिती होता पण ज्या परिस्थितीतून अशोक भावके आले होते. ती परिस्थिती बघितली तर हे धाडस मोठं होत. त्यानंतर ते शिवसेनेच्या माध्यमातून काम करत राहिले. झुणका भाकरी केंद्र आणि अन्य उद्योगातून त्यानी जम बसवला, मात्र धाडसाचं वेड असणाऱ्या अशोकरावांनी ज्या घोगावमध्ये हायस्कूल नव्हते. त्याठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याच धाडस केलं. कॉलेज उभं झाल्यानं या भागातील अनेक विद्यार्थी इंजिनिअर झाले.
घोगाव (karad) गावाचाही चेहरामोहरा अशोक भावके यांच्यामुळे बदलला. नंतरच्या काळात अनेक अडचणींमुळे ते राजकारणाच्या (politics) बाहेर पडले. त्यांना उद्योगातही अडचणी आल्या पण धडपडत राहिले, हरले नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या व्हिजनमुळ ते मोठे झाले. अनेकांना मोठं केलं. पण चांगली माणस देवालाही आवडतात तसचं अशोक भावकेही आवडले. कमी वयातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबासोबतच भागाचही नुकसान झालं आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.