Bajrang Punia 
देश विदेश

Bajrang Punia: काँग्रेस जॉईन करताच कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

Bajrang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनिया याला परदेशातील मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर कॉल आला. या कॉलवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्याने त्यांना काँग्रेस सोडण्यास सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

देशाचा स्टार कुस्तीपटू आणि नुकतीच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बजरंग पुनिया याला जीवे धमकी देण्यात आलीय. अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर मेसेज करत पुनियाला काँग्रेस सोडण्याची सूचना केली. व्हॉट्सॲपवर आलेल्या या मेसेजची तक्रार बजरंग पुनियाने हरियाणातील सोनीपत पोलिसांकडे केलीय. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

बजरंग पुनिया यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार, मेसेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीने हा मेसेज केलाय. यात काँग्रेस पक्ष सोडण्याचं सांगितलंय. जर पुनियाने तसे केले नाही तर ते त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयासाठी चांगले नसेल. काँग्रेस पक्ष सोडण्याचं मान्य केलं नाहीतर हा मेसेज शेवटचा मेसेज असेल, असा मेसेज असल्याचं बजरंगने म्हटलंय. बजरंगने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सोनीपतच्या बहलगड पोलीस ठाण्यात केली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशातील स्टार कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी हरियाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सदस्यत्व घेत पक्षात प्रवेश केलाय. विनेश फोगट जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र बजरंग पुनिया निवडणूक लढवणार नाहीये. मात्र काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यापूर्वी विनेश आणि बजरंग या दोघांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी या दोघांनीही रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिलाय.

कुस्तीपटूंच्या संघर्षात भाजप आमच्या पाठीशी उभा राहिला नाही. काँग्रेस पक्षात घेतल्यानंतर पुनियाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर ८ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

काय आहे धमकी

'बजरंग पुनिया, काँग्रेस सोडा, नाहीतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही, हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुम्हाला पाहिजे तिथे तक्रार करा, हा आमचा शेवटचा आणि पहिला इशारा आहे.

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटूंपैकी होते ज्यांनी मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात अनेक कनिष्ठ महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या घटनेनंतर त्यांच्यात भाजपबद्दल नाराजी दिसून येत होती.

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटूंपैकी होते ज्यांनी मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात अनेक कनिष्ठ महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. या घटनेनंतर त्यांच्यात भाजपबद्दल नाराजी दिसून येत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT