Wrestlers Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट विरोधात गुन्हा दाखल, दंगल भडकावण्यासह अनेक कलमांतर्गत कारवाई

Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Wrestlers
WrestlersSaam TV

Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नॅशनल हिरो असलेल्या विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काल अनेक कुस्तीपटू संसद भवनच्या निघाले असता दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देशात हुकूमशाही सुरू झाली आहे का?

कारवाईवर विनेश फोगटने म्हटलं की, आमचं लैंगिक शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण विरोधात एफआयआर नोंदवायला दिल्ली पोलिसांना 7 दिवस लागले आणि शांततेने आंदोलन केल्यामुळे आमच्याविरोधात एफआयआर नोंदवायला 7 तासही लागले नाहीत. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे का? सरकार आपल्या खेळाडूंशी कसे वागते हे सारे जग पाहत आहे. नवा इतिहास लिहिला जात आहे.

Wrestlers
Eknath Shinde On New Parliament: नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलिसांनी साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना काही तासांनंतर सोडलं तर बजरंग पुनियाला रात्री उशिरा सोडण्यात आले. पुनियाने त्यांच्या पोलीस कोठडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुनियाने ट्विटरवर लिहिले की, मी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस काहीही सांगत नाही. मी काही गुन्हा केला आहे का? ब्रिजभूषण तुरुंगात असायला हवे होते. आम्हाला तुरुंगात का ठेवले आहे? (Latest News Update)

Wrestlers
Rahul Gandhi Tweet: नॅशनल हिरोंना भररस्त्यात फरफटत नेलं, कुस्तीपटुंवर पोलिसांचा बळाचा वापर; राहुल गांधींनी शेअर केला VIDEO

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?

कुस्तीपटूंवर कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदेशीर सभा), १८६ (सरकारी कामात अडथळा आणणे), १८८ (आदेशाची अवज्ञा करणे), ३३२ आणि ३५३ सह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com