Eknath Shinde On New Parliament: नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Cm Eknath Shinde On New Parliament Inauguration
Cm Eknath Shinde On New Parliament InaugurationSaam Tv

Cm Eknath Shinde On New Parliament Inauguration: नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

राजधानी नवी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

Cm Eknath Shinde On New Parliament Inauguration
Manipur Violence: मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रखर देशाभिमानी असलेल्या प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे. त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अशा वास्तूचे आज लोकार्पण झाले असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल असा विश्वास आहे. आजचा दिवस हा १४० कोटी जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. प्रधानमंत्री मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केल्याचे सांगत त्यांनी प्रधानमंत्री मोदींचे आभार मानले. (Latest Marathi News)

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्वधर्म प्रार्थना सभा झाली. मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी लोकशाही मंदिराचे वातावरण अतिशय भक्तीमय झाले झाल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव देखील प्रधानमंत्री मोदी यांनी केला.

Cm Eknath Shinde On New Parliament Inauguration
Dhananjay Munde Latest News: गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार, धनंजय मुंडेंनी सांगितला 'तो' किस्सा...

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती महाराष्ट्र सदनात साजरी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com