Dhananjay Munde Latest News: गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार, धनंजय मुंडेंनी सांगितला 'तो' किस्सा...

गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार, धनंजय मुंडेंनी सांगितला 'तो' किस्सा...
Dhananjay Munde
Dhananjay Munde Saam Tv
Published On

Dhananjay Munde Latest News: ''गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार नाही. अमेरिकेच्या नागरिकांची आणि माझ्या गावाकडच्या माणसाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी होऊचं शकत नाही'', असं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

बीडमध्ये त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आलेल्या अनुभवाचा किस्सा मतदार संघातील एका गावच्या माणसाचा किस्सा सांगितलाय. बीडच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

Dhananjay Munde
Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका किरीट सोमय्यांकडून मागे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

किस्सा सांगताना धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, ''ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस जगात कुठं सापडणार नाही. आम्ही अमेरिकेच्या नागरिकांची आणि माझ्या गावाकडच्या माणसाच्या बुद्धिमत्तेची बरोबरीची होऊ शकत नाही. एवढा माझा गावाकडचा माणूस बुद्धीन श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल हे कसं?''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''माझ्या मतदारसंघात एक गाव आहे. गावातली लोक एवढी हुशार. ग्रामपंचायतची निवडणूक लागली. चार पॅनल उभे केले. मतदार एवढे हुशार..नऊ पंच.. एक सरपंच निवडून द्यायचा होता. एका पॅनलचे 3 दिले, दुसऱ्या पॅनलचे 3 दिले, तिसऱ्या पॅनलचे 3 दिले आणि चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून आणला.''

Dhananjay Munde
Kalyan Viral Video: पालिकेला कंटाळून हाती घेतला फावडा! रिक्षाचालक 8 वर्षांपासून बुजवतोय रस्त्यावरील खड्डे, व्हिडीओ व्हायरल

ते पुढे म्हणाले, ''मग गावाकडचा माणूस साधाय का? हे कशासाठी सांगतोय, उद्या ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीचे मतं मोजणीच्या काळात जो विषय येत असतो, तेव्हा ते कळत असतं. या गावातलं मतदान कोणाचं कोणाला पडलंय. आपल्या सुद्धा गणना ही कळाल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून आपण किती उशारी, ग्रामपंचायतीमध्ये करताल. किती उशारी सेवा सोसायटीमध्ये करताल. पण मोठ्या इलेक्शनच्या मशीनच्या निवडणुकीमध्ये, ती उशारी आपली गावच्या कर्त्या माणसाला आणि निवडणुकीत उभ्या राहिलेल्या माणसाला नक्कीच कळते, असं म्हणत धनंजय मुंडेंनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आलेल्या अनुभवाचा किस्सा जाहीर भाषणातून सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com