Kalyan Viral Video: पालिकेला कंटाळून हाती घेतला फावडा! रिक्षाचालक 8 वर्षांपासून बुजवतोय रस्त्यावरील खड्डे, व्हिडीओ व्हायरल

पालिकेला कंटाळून हाती घेतला फावडा! रिक्षाचालक 8 वर्षांपासून बुजवतोय रस्त्यावरील खड्डे
Kalyan Rickshaw Driver Viral Video
Kalyan Rickshaw Driver Viral VideoSaam Tv

>> अभिजित देशमुख

Kalyan Rickshaw Driver Viral Video: कल्याणमधील एका रिक्षाचालकाला व्हिडीओ व्हायरल होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे बुजविण्यासाठी या रिक्षाचालकाने पुढाकार घेतलाय. बेतुरकरपाडा येथे राहणारा हा रिक्षा चालक जिथे रस्त्याचे काम सुरू असेल त्या ठिकाणाहून डांबर मिश्रित खडी मागून घेतो आणि जिथे खड्डे असतील त्याठिकाणी ही खडी टाकून खड्डे बुजवतो.

गेल्या आठ वर्षापासून या अवलिया रिक्षा चालकाचा दिनक्रम अविरतपणे सुरू आहे. राजमनी यादव असे या रिक्षा चालकाचे नाव असून सहजानंद चौक येथील खड्डा बुजवतनाचा व्हिडीयो सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. निदान आता तरी महापालिका खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी पुढाकार घेणार का असा सवाल उपस्थित होतोय.

Kalyan Rickshaw Driver Viral Video
New Parliament Inauguration: राष्ट्रपती मागासवर्गीय असल्याने त्यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन केले नाही, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम बेतुरकरपाडा परिसरात राजमणी यादव हा रिक्षा चालक राहतो. रिक्षा चालवून राजमनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. राजमनी गेल्या आठ वर्षापासून सातत्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतोय. (Latest Marathi News)

जिथे महापालिकेचे रस्त्याचे काम सुरू असेल तेथून तो खडी मागुन घेतो. ही खडी रिक्षात टाकून तो ज्या ठिकाणी खड्डे असतील तिकडे ही खडी स्वतःच टाकून खड्डे बुजवतो. रोज ये करताना बेतूरकरपाडा परिसरात एक खड्डा राजमनी बघत होता.

Kalyan Rickshaw Driver Viral Video
Bombay High Court: न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

याचाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हरल होत आहे. या व्हिडीओत कल्याणमधील एका रस्त्यावर हा रिक्षाचालक खाद्य बुजवताना दिसत आहे. या रिक्षाचालकाने शहरातील अनेक खड्डे आतापर्यंत बुजवले आहेत.

याबाबत बोलताना राजमनी यांनी सांगितलं की, याबाबत महापालिकेला काय तक्रार करू? याच रस्त्यावरून महापालिकेचे अधिकारी कर्मचारी येतात जातात. त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मी स्वतःच जमेल तसे हे खड्डे बुजवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com