Bombay High Court: न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Justice Ramesh Dhanuka sworn in as Chief Justice of Bombay High Court
Justice Ramesh Dhanuka sworn in as Chief Justice of Bombay High CourtSaam Tv

New Chief Justice of Bombay High Court: उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.

Justice Ramesh Dhanuka sworn in as Chief Justice of Bombay High Court
Pizza Unique Offer: हवा तितका 'पिझ्झा' खा, बिल मृत्यूनंतर भरा; कंपनीची आगळीवेगळी ऑफर

सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.

कोण आहेत रमेश देवकीनंदन धानुका?

दिनांक ३१ मे, १९६१ रोजी न्या. रमेश धानुका यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी संपादन केली. १९८५ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या तिसऱ्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि द्वितीय क्रमांक मिळविला. (Latest Marathi News)

Justice Ramesh Dhanuka sworn in as Chief Justice of Bombay High Court
Credit Cards: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास फायदा होतो की तोटा? जाणून घ्या

ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ वकील पॅनेलवर होते. न्या. धानुका दिनांक २३ जानेवारी २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com