Pizza Unique Offer: हवा तितका 'पिझ्झा' खा, बिल मृत्यूनंतर भरा; कंपनीची आगळीवेगळी ऑफर

हवा तितका 'पिझ्झा' खा, बिल मृत्यूनंतर भरा; कंपनीची आगळीवेगळी ऑफर
Pizza Unique Offer
Pizza Unique OfferCanva
Published On

Buy Now, Pay In The Afterlife: सध्या 'बॉय नाऊ पे लेटर'सारख्या (Buy Now Pay Later) ऑफर्स अनेक उत्पादनांवर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इन्स्टॉलेशनमध्ये पेमेंटचा पर्याय देखील आहे. परंतु अलीकडेच एका रेस्टॉरंटने दिलेली ऑफर आश्चर्यचकित करणारी आहे.

Afterlife Pay : 'मृत्यूनंतर भरा बिल'

न्यूझीलंड पिझ्झा चेनने ही आगळीवेगळी ऑफर दिली आहे. त्यांची पेमेंट ऑफर "Afterlife Pay" आहे. ब्रँडच्या वेबसाइटनुसार, ही ऑफर फक्त 666 ग्राहकांसाठी वैध आहे. यामध्ये ग्राहकांना एका करारावर स्वाक्षरी करावी लागेल, ज्यामध्ये ते मृत्यूनंतर पिझ्झाचे बिल भरू शकतात.

Pizza Unique Offer
Credit Cards Pros & Cons: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास फायदा होतो की तोटा? जाणून घ्या

ग्राहकांना सुरुवातीला हे विचित्र वाटेल, परंतु पिझ्झा कंपनी त्यांना आश्वासन देते की, यात कोणतेही छुपे शुल्क किंवा दंड नाहीत. न्यूझीलंड पिझ्झा चेनने सीईओ बेन कमिंगचा दावा आहे की, ''ही सिस्टिम "आता खरेदी करा, नंतर पैसे द्या" च्या सापळ्यात अडकलेल्या न्यूझीलंडमधील नागरिकांच्या वाढत्या समस्येला दूर करते.''  (Latest Marathi News)

मृत्यूनंतर बिल कसा भरणार?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर घेणाऱ्यांसोबत एक करार केला जाईल. ज्यामध्ये त्यांच्या मृत्युपत्रात याबद्दल लिहिले जाईल. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यावर कोणतेही व्याज किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला इशारा

यातच न्यूझीलंडच्या ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या योजनेचा सखोल अभ्यास केला आहे आणि इशारा दिला आहे की, यामुळे व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे आणि व्यक्ती कर्जात बुडू शकते. ग्राहकांनी केवळ मोफत पिझ्झा मिळवण्यासाठी ही ऑफर स्वीकारू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com