30 terrorists killed in defensive operations in Manipur
30 terrorists killed in defensive operations in ManipurSaam TV

Manipur Violence: मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

30 Terrorists Killed in Defensive Operations in Manipur: मणिपूरमध्ये अनेक भागात सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सोमवारी येथे दौरा आहे. त्याआधी लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

हिंसाचाराच्या घटनांदरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दावा केला की, राज्यातील विविध भागात सुमारे 30 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे. ते म्हणाले की, दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्निपर गन वापरल्या जात आहेत. कारवाई सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 31 मे पर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

30 terrorists killed in defensive operations in Manipur
Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका किरीट सोमय्यांकडून मागे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एन. बिरेन यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या विरोधात शस्त्रे वापरणाऱ्या दहशतवादी गटांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी विविध भागात सुमारे 30 दहशतवादी मारले गेले आहेत. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, हिंसाचार पसरवणाऱ्यांवर सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. अनेकांना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे. ते म्हणाले की, दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. ही लढाई मणिपूर तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांविरुद्ध आहे.

30 terrorists killed in defensive operations in Manipur
Dhananjay Munde Latest News: गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार, धनंजय मुंडेंनी सांगितला 'तो' किस्सा...

दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परिस्थिती चिघळल्यानंतर इथून मोठ्या संख्येने लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com