Crime Saam Tv
देश विदेश

Crime: २ मुलांच्या बापाची महिला सहकाऱ्यावर वाकडी नजर; लग्नाचे आमिष दाखवून केला भयंकर प्रकार

Married Man Arrested for physical assaulting and Cheating Female Colleague: लग्नाचे आमिष दाखवून एका सहकर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केला आहे. आरोपी हा आधीपासून विवाहित असून, त्याने ही गोष्ट लपवून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

Bhagyashree Kamble

ग्रेटर नोएडामधून एका महिला अत्याचाराची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका सहकर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केला आहे. आरोपी हा आधीपासून विवाहित असून, त्याने ही बाब लपवली, तसेच पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव मोनू आहे. तो आणि पीडित महिला एका कारखान्यात एकत्र काम करत होते. या काळात त्यांची मैत्री झाली. मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीडितेला आरोपी मोनू आधीच विवाहित असल्याचे समजले. तसेच त्याला २ अपत्य असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महिलेने मोनूसोबत संबंध तोडले. मात्र, तरीही आरोपी बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. यामुळे पीडित महिला आणि मोनूमधील वाद वाढला.

कसना पोलिस स्टेशनचे प्रभारी धर्मेंद्र कुमार शुक्ला म्हणाले की, पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी मोनूविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT