
नागपूरच्या धरमपेठ परिसरात काही तरणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास काही तरूणांनी अर्धनग्न अवस्थेत गाडीतून जोरजोरात हॉर्न वाजवून गोंधळ घातला होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण ७ तरूणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या तरूणांमध्ये एक अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. फिल्मी स्टाईलनं रस्त्यावर गोंधळ घालणं तरूणांना चांगलंच महागात पडलं असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलीस चौकशीत उघड झाले की, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हे सर्व तरूण विद्यार्थी असून धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. एका पार्टीनंतर ते आपली चारचाकी आणि गाड्या घेऊन रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. तसेच जोरजोरात हॉर्न वाजवून धिंगाणा घातला. यावेळी तरूण अर्धनग्न असल्याची माहिती समोर आली आहे.
तरूणांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे तरूणांवर बॉम्बे पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्या तरूणांना ताब्यात घेतले आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अभिक घोष, राघव पटेल, पलाश बजाज, आदिल फ्रान्सिस, विश्वांग तिवारी, संजय अग्रवाल, तर एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलाच्या पालकांना बोलावून त्यांना याची माहिती देण्यात येणार आहे.
फिल्मी स्टाईलने मोकळ्या रस्त्यावर गोंधळ घालणं या तरूणांना चांगलंच महागात पडलं असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.