Quarrel Between Fiance and Fiancee
Quarrel Between Fiance and Fiancee Saam tv
देश विदेश

Quarrel Between Fiance and Fiancee: लग्नाच्या आधीच तरुणीने केली भलतीच मागणी; तरुणाने नकार देताच केलं अजब कृत्य

Vishal Gangurde

China News : नवरी मुलीचं लग्नानंतर सासरमधील सर्वच काही तिचं होत असतं. अनेकजण मस्करीमध्येही म्हणतात की, नवऱ्याच्या पगारही बायकोचा होऊन जातो. नवरा-बायको यांच्या काही वेळेस वाद होतच राहतात. काहींचे वाद इतके टोकाला जातात की, अनेक जण घटस्फोटाचा निर्णय घेतात. अशा जोडप्यांच्या वादविवादामुळे त्यांचे होणारे लग्नही मोडली जातात. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

चीनमध्ये (China) तरुण-तरुणीचा साखरपु़डा झाला होता. चीनमधील या तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला वार्षिक बोनस (Annual Bonus) मागितला. मात्र, तरुणाने देण्यास नकार दिला. मात्र, तरुणाकडून नकार मिळाल्याने चिडलेल्या तरुणीने थेट लग्नच मोडलं. त्यानंतर तरुणीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केलं.

एका मीडिया रिपोर्टनुसार, चीनमधील हा प्रकार झेजियांग प्रांतातील आहे. दक्षिण चीनमधील मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, प्रियसीने लग्न मोडल्याने तरुणाने त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. वार्षिक बोनससाठी प्रियसीने लग्न मोडल्याचे कारण त्याने जगजाहीर केले. तर वादाच्या एका महिन्यानंतर तरुणीने विवाह केल्याचेही तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) जाहीर केले.

चीनमधील हा तरुण या तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचा विवाह एक महिन्यांनी होणार होता. मात्र, एकेदिवशी तरुणीने लग्नानंतर वार्षिक बोनस पाहिजे, अशी मागणी केली. प्रियसीच्या अजब मागणीनंतर प्रियकर चक्रावला. मात्र, प्रियकराने वार्षिक बोनस देण्यास नकार दिला. शियाओली असं या तरुणाचे नाव आहे.

रिपोर्टनुसार, शियाओलीने वाद झाल्यानंतर त्याच्या होणाऱ्या बायको आणि तिच्या आई-वडिलांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की, माझा पगार खूप जास्त नाही. त्यामुळे माझा वार्षिक बोनसच जगण्याचा मोठा आधार आहे'. मात्र, अनेक नानाविविध विनंत्या करून तिच्या घरचे ऐकण्यास तयार नव्हते.

शियाओली पुढे म्हटला की, 'मी माझा वार्षिक बोनस प्रियसीला दिला असता तर, मला जीवनशैलीत खूप काही बदल करावे लागले असते. त्या दोघांचं लग्न पैशांमुळे मोडलं गेलं. याच पैशांवरून दोघांमध्ये खूप वाद झाले. शियाओलीने तरुणीच्या आई-वडिलांना देखील फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याचं लग्न मोडलं.

या सर्व प्रकारामुळे शियाओलीला मोठा धक्का बसला आहे. शियाओलीच्या प्रियसीने तिच्याच एका एक्स बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. 'या तरुणीचं हसू येतं की, ती लग्न करण्यासाठी एका महिन्यापूर्वी खूप उत्सुक होती, असं शियाओली म्हटला. दरम्यान, चीनच्या या तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT