Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Lok Sabha Election 2024 : ठाकरे यांनी दीपक केसरकर आणि नारायण राणे मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप केला, यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल सावंतवाडीत जाहीर सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर आणि नारायण राणे मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप केला, यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांना कमी वयात मंत्रीपद मिळालं असून त्यांनी ते मंत्रीपद जनतेसाठी विशेषतः कोकणच्या जनतेसाठी वापर करू शकले नाही. आम्ही कायम भांडत रहावं आणि कोकण विकासापासून दूर राहावं असं त्यांना वाटत. कारण त्यांना कोकणाशी काही देणं घेणं नाही. आम्ही भांडायच आणि तुम्ही त्याची राजकीय पोळी भाजणार हे आता विसरा असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मायनिंग व भूमाफीयांच्या घशात घालण्याचा राणे व केसरकर यांचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता यावर बोलताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्या हा इको सेन्सिटिव्ह जिल्हा झाला, त्यामुळे मायनिंग या जिल्ह्यात येऊ शकत नाही. राहुल गांधी यांच्या नादी लागून काही पण बोलून, खोटं बोलून आपल अज्ञान आदित्य ठाकरे प्रदर्शित करत आहेत.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढवावी लागते अशी टीका केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांच्या कुबड्यांच्या ताकदीवर तुम्ही गमश्या मारू नका. बाळासाहेब एकटे निवडणूक लढवायचे तुम्ही एकटे लढा तुमची ताकद समजेल. काँगेस, राष्ट्रवादीच्या जीवावर आम्हाला धमकी देता. तुम्ही आमची बदनामी करता महाराष्ट्र माफ करणार नाही.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

पावणे चार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली, इतर चार राज्यांची एकूण गुंतवणूक महाराष्ट्रा एवढी होत नाही. ती गुंतवणूक गुजरात ला नेली का? फक्त गुजरात गुजरात करायचं, आता राज्यात एक सर्वात मोठा प्रकल्प येत आहे तेव्हा सर्वांची तोंड बंद होतील असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.

जिल्ह्यातील तुमच्या शिवसेनेला किती मत होती ते बघा. ४० ते ४५ हजार मत संपूर्ण जिल्ह्यात होती, मात्र मी शिवसेनेत आलो तेव्हा दीड पावणे दोन लाख मत झाली, तुम्हाला बोलायला काही वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. भाजप मला कॅबिनेट मंत्री करणार होते मात्र मी ते सोडून बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिवसेनेत आलो. मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी माझी माफी मागितली. जेव्हा जिल्ह्यात कोणी पेट्रोल देत नव्हत, कार्यकर्त्यांच्या घरी राहावं लागत होत हे विसरलात का? राणेंच्या देष साठी माझी लढाई नव्हती, तत्वासाठी लढा दिला. राणेंचे आणि माझे व्यक्तिगत सबंध खूप चांगले होते. कोकणच्या हिताच्या गोष्टी साठी आम्ही कोकणी माणस एकत्र येणार. विकासाच राजकारण करा.

Maharashtra Politics 2024
Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com