Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Ajit Pawar: बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आमदार रोहित पवार हे भावुक झाले आहेत.
Ajit Pawar on Rohit Pawar
Ajit Pawar on Rohit PawarSaam Tv

Ajit Pawar on Rohit Pawar:

बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आमदार रोहित पवार हे भावुक झाले आहेत. यातच अजित पवार यांनी मतदारांना भावनिक आव्हानांना बळी पडू नका, हे आवाहन केलं. रडीचा डाव बारामतीकर खपवून घेणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवारांना अश्रू अनावर

बारामती येथील सभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, ''साहेबांबरोबर (शरद पवार) बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो, साहेब टीव्ही पाहत होते. चेहऱ्यांवर त्यांनी नाही दाखवलं. ते टीव्ही पाहत असताना आम्ही त्यांना काही प्रश्न केले. त्यांनी आम्हाला त्याचे उत्तर दिले. त्यावेळी ते (शरद पवार) म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला महाराष्ट्र आहे, तो आपल्याला घडवायचा आहे.''

Ajit Pawar on Rohit Pawar
Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र घडवत असताना आपल्याला नविन पिढी तयार करायची आहे, नविन पिढीला ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नविन पिढीही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी स्विकारण्याच्या पातळीची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द आहे.'' असं म्हणत रोहित पवार हे भावुक झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हे स्वतः उपस्थित होते.

रडीचा डाव करू नका: अजित पवार

बारामतीत आज अजित पवार यांचीही सभा होती. रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रडीचा डाव करू नका, असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भरसभेत अजित पवार यांनी रोहित पवार यांची नक्कलही केली.

Ajit Pawar on Rohit Pawar
Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

यावेळी अजित पवार म्हणाले की,''आमच्या ऐकान डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. हे असलं करून जमत नाही, हा रडीचा डाव आहे.'' आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत आणि तुम्ही आमच्यावर टीका करता, असं म्हणत अजित पवार यांची रोहित पवारांवर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com