Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

Praful Patel: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे, यामुळे आपण सर्वांनी भाजपासोबत जायला पाहिजे, असं कोल्हेंचे मत होते: प्रफुल्ल पटेल
'...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान
Praful Patel on Amol KolheSaam Tv
Published On

>> रोहितदास गडदे

Praful Patel on Amol Kolhe:

''अमोल कोल्हेंना निवडणुकीला उभं रहाण्याची इच्छा नव्हती. कंटाळलो, वेळ मिळत नाही, जबाबदारी सांभाळता येत नाही,असं मत कोल्हेंनी अनेक वेळा बोलून दाखवलं होतं. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे, यामुळे आपण सर्वांनी भाजपासोबत जायला पाहिजे, असं कोल्हेंचे मत होते. त्यामुळे अजित पवारसह अनेक मंत्र्यांच्या शपथविधीला अमोल कोल्हे उपस्थित राहिले. जे आहे, ते खरं सांगितले. वेगळं काही सांगितले नाही'', असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अमोल कोल्हे संसदेत भाषण करुन व्हायरल केलं. एवढ्यापुरती संसदेची हजेरी नसते, असं म्हणत अमोल कोल्हे यांना प्रफुल्ल पटेलांनी सुनावले आहे.

'...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान
Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

ते म्हणाले, ''संसदेचे आदिवेशन काळात मतदारसंघातील कामे करुन घ्यायची असतात. त्यामुळे मला माहिती आहे, शिरूरमध्ये काय काम केलं. संसदेबरोबर पक्षाच्या कमिटी बैठकीला पण गैरहजरी. ३३ वर्ष मी खासदार आहे. संसदरत्न हा विकास किंवा लोकांची सेवा केल्याचे प्रमाणपत्र नाही. प्रश्न विचारून जर देशाचे प्रश्न सुटत असतील, तर अशा बोलक्या लोकांमध्ये कृत्य मात्र शुन्य असतं.''

'...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान
Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

कसाबने हेमंत करकरे यांना मारले नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. यावर बोलताना पटेल म्हणाले, ''२६/११ काय झालं हे वडेट्टीवारांना काय महिती आहे, पोलीसांनी केलेली कामगिरी आणि त्यांचे बलीदान यावर बोलून त्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. त्यावेळी मुंबई पोलीसांनी जिवाचा विचार न करता आपल्याला वाचविण्याचे काम केलं, त्यांच्याबद्दल असं बोलणं चुकीचं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com