Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (5 may 2024): लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आणि देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
5 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
5 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

१७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसला शिव्या देत मागच्या वेळी लोकांनी भाजपला मत दिले पण त्यांचा भ्रमनिरास झाला

आपण पूर्णपणे १०० टक्के मतदान केलें पाहिजे हे लक्षात घ्या

काँग्रेस ला तेव्हा त्यांना वाचवता आले नाही

२०१४ नंतर किती जणांनी भारतीय नागरिकत्व सोडलं हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला

१७ लाख कुटुंबीयांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे

सरकार ने कसली ही करणे दिलेले नाही

चंदा द्या नाहीतर ई डी ला सामोरे जा असं या कुटुंबीयांना सांगण्यात आलं

आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एखाद्या दारूड्याची प्रवृत्ती एकच आहे

दारुड्याकडे जेव्हा पैसे नसतील तेव्हा तो काय करतो गोष्टी विकायला काढतो, मोदींनी एअर इंडिया विकली, एल आय सी विकायला काढली आहे, का तर सरकार चालवायला पैसा नाही

तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवारांच्या तब्येतीमुळे उद्याचे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात आले रद्द

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे उद्या अनेक सभा आणि अनेक कार्यक्रम होणार होते

तब्येत अस्वस्थामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द

उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार

एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे उजनीतून पाणी सोडले जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आले होते

- सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

10 मे रोजी सोडण्यात येणारं पाणी 20 मे पर्यंत औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोहोचणार आहे.

अखेर नाराज विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रात्री ठाण्यामध्ये विजय करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश

उमेदवारी नाकारल्याने विजय करंजकर ठाकरे गटात होते नाराज

विजय करंजकर यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांना आणखी एक मोठ यश

विजय करंजकर यांच्या प्रवेशाने मविआ उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

नाशिक- भाजपचे नाराज अनिल जाधव यांच्या समर्थक संवाद मेळाव्याला सुरुवात

नाशिक लोकसभा मतदार संघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी

भाजप कडून इच्छुक मात्र उमेदवारी न मिळाल्याने जाधव यांच्याकडून बंडखोरी

समर्थक संवाद मेळाव्याला जाधव यांनी लावले मोदी आणि फडणवीस यांचे फोटो

समर्थक संवाद मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची ठरणार रणनीती

भाजपचे बंडखोर अनिल जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती अरींगळे यांच्या बंडखोरीने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे टेन्शनमध्ये

उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने महायुती मध्ये झालेली बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश येणार का?

मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही

मागच्या १० वर्षांपासून हा प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित

काँग्रेस नेते जयराम रमेश यांची ट्विट करत मोदी सरकारला दिली आठवण करून

२००४ ते २०१४ या १० वर्षात मनमोहन सिंग सरकारने तमिळसह इतर भाषाना दिलेल्या अभिजात दर्जाचा दिला दाखला

२०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना लिहिलेल्या पत्राचा दिला दाखला

सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे.आज सोलापूरात ४४.४ अंश सेल्अशस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ३० एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सियस इतके होते.तर आज सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता.सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. सोलापुरात सलग दोन दिवस ४४ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राम मंदिरात पोहोचणार

राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच घेणार दर्शन

पंतप्रधान मंदिरात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिरात दाखल

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मंदिरात जय्यत तयारी

दर्शनानंतर पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो

मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार आहे, अजून ते काय काय बोलतात हे सगळ मी बघत आहे. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे योग्य वेळी ते मी समोर आणेन.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

अरे मामा जरा जपून,काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही..आज इंदापूर शहरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत शरद पवारांनी इंदापूर चे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना भर सभेत दम भरला आहे.

मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला होता

आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश

साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

तीन चार महिन्यांत कारखान्याचे पुनर्वसन करू.

कारखान्या बरोबर राजकारण महत्त्वाचे आहे.

लोकांच्या जे मनात आहे तेच माझा मनात आहे. काळजी करू नका.

अभिजीत पाटील यांच्या पाठीशी आम्ही उभा राहू.

मोदीने साखरेची एम एसपी वाढवली .

मोदीने एम एसपीचा कायदा केला.

गेली 20 वर्षं आयकर विभागाची साखर कारखान्यावर टांगती तलवार होती.

मोदी सरकारने सहकार खाते तयार केले.

साखर कारखान्याचा दहा हजार कोटींचा आयकर माफ केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

स्वाभिमानी आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या रॅली सामोरा समोर आल्याने इचलकरंजीत प्रचंड तणाव

इचलकरंजीतील शिवतीर्थ चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने - सामने

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची घटना पोलिसांनी रोखली

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पक्षांची जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असताना रॅली आमने सामने आल्यानं कार्यकर्ते आक्रमक

पोलीस आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या प्रचंड धक्काबुक्की

धुळे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा असणार कडेकोट बंदोबस्त

धुळे जिल्हामध्ये 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, आणि यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली आहे.

जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

दिंडोरी मध्ये सुरू असलेली माकपची बैठक संपली

लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित यांनी निवडणूक लढवायची की माघार घ्यायची यासंदर्भात उद्या पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार

माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी जेपी गावित यांची सुरू आहे चर्चा

जेपी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीचे वाढले आहे टेन्शन

जेपी गावित यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात उद्या पत्रकार परिषदेत घेणार निर्णय

खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ भाजपच करू शकतं; आदित्य ठाकरे

खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ भाजपाच करू शकतं,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोजांनी केलेल्या विधानावरून टीका केली आहे. सगळी यंत्रणा,ईडी,सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे अशा लोकांना आम्ही उत्तर देत नाही,असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. सांगलीच्या विटा येथे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार निमित्त बोलत होते. तसेच मुंबईचे अडीच वर्षात जे हाल झाले,ते भाजपाच्या हाताने झाले आहेत, असा आरोप देखील यावेळी आदीत ठाकरे यांनी केला आहे.

मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. याच अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा असल्याचे सांगत आपणच विजयी होऊ असा दावा केलाय.मराठवाड्याच्या हक्काच पाणी धाराशिवला आणण्यासह,चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणे आणि तुळजाभवानी मंदिरासह मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा विकास आपल्याला करायचा असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला

नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

ठाणे लोकसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारातून नवी मुंबई भाजप दूर असली तरी त्यांची जागा नवी मुंबई मनसे भरून काढतेय. नवी मुंबई मनसे नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला लागली असून शिवसेना आणि मनसे यांची नियोजन बैठक देखील पार पडलेय. या बैठकीत म्हस्के यांच्या प्रचाराची रणनिती ठरविण्यात आली आहे. म्हस्के यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

केंद्रातील सरकार जाणार आहे त्या नंतर राज्यातील सरकार जाणार

हे सरकार म्हणजे अग्निवीर सरकार आहे त्यांना ना पेन्शन मिळणार

मोदींचा महाराष्ट्रमध्ये अयशस्वी प्रयोग आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपेक्षा निकाल लवकर जाहीर केला जाणार असे संकेत राज्य मंडळानेच दिले आहेत. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता आहे.

PM Modi Beed Sabha: पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी सभा होणार आहे. बीडच्या अंबाजोगाई येथे ही सभा होणार आहे. सभेसाठी भव्य असा मंडप उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळाच्या कामाची पाहणी केली आहे. या दौऱ्यासाठी गेल्या आठवड्यापासून आमची तयारी सुरू आहे. ग्राउंड साठी लागणारे सुरक्षा व्यवस्था बॅरीगेटिंग याचे नियोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असणार असून याकडे अधिकारी लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

जालन्यातील गोलापांगरी येथे आज रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली ही विनंती मान्य करत दानवे व्यासपीठावरून खाली उतरले. यावेळी मराठाआंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा लाख मराठा अशी घोषणा बाजी केली. दरम्यान दानवे यांनी शांतपणे आंदोलकांचं ऐकून घेत त्यांचं निवेदन स्वीकारलं. तसेच त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवल. दरम्यान याठिकाणच्या सभेनंतर दानवे पुन्हा मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत.

उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

लोकसभा निवडणुकीची देशभरात धामधूम सुरू आहे. दुसर्‍या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर आता २० मे रोजी मुंबईत होणार्‍या मतदानाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघात महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीने देखील प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

उत्तर मुंबईतून शिवसेना भाजपा महायुतीकडून उमेदवारी मिळवलेल्या पियुष गोयल यांनी आज रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत उत्तर मुंबई मतदार संघातील मागाठाने मतदार संघात भव्य रॅली काढली. या रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते सामील झाल्याचे देखील पाहायला मिळले.

गोयल यांचे मागाटाने मतदारसंघातील नागरिकांकडून उस्फूर्तपणे स्वागत देखील केले जात आहे. प्रचंड उन्हातही कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! रावसाहेब दानवे आज पुन्हा अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी

रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल होत भेट घेतली. मागच्या अनेक दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या प्रचारापासून दूर होते. त्यामुळं आज दुसऱ्यांदा दानवेंनी खोतकरांची भेट घेतली. दोघांच्या मनोमिलनानंतर आजपासून खोतकर दानवेंचा प्रचार सुरु करणार आहेत. आज गोलापांगरी याठिकाणी दोघांचीही प्रचार सभा होणार आहेत. दानवे खोतकर.. मतभेद मिटले.! मन भेदाचे काय..? आज मिटेल का.? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.

मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Jalana News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जय पवार यांचा सत्कार करण्यात आला.

मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांच्या खांद्यावर पुन्हा काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवली आहे. नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र स्टार प्रचारकची देण्यात आली आहे. त्यामुळे नसीम खान आता प्रचारात सक्रिय होणार आहेत.

अलिबागमध्ये उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेत नेते जयंत पाटील यांच्यासोबत लोकसभेचा नसीम खान आज महाविकास आघाडीचा प्रचार करणार आहेत.

Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पुढील नऊ दिवसात सभांचा मोठा धडाका लावण्यात आला आहे. याची सुरुवात ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे आणि राज्यातील उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा अहमदनगर जिल्ह्यात होणार आहेत.

पाहुयात कोण कोण सभेला येणार आणि कुठे येणार

  • 8 मे बोधेगाव धनंजय मुंडे दुपारी 4 वाजता

  • 8 मे राहुरी धनंजय मुंडे सायंकाळी 6 वाजता

  • 9 मे जामखेड उपुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस वेळ निश्चित नाही

  • 9 मे कर्जत उपुख्यमंत्री अजित पवार दुपारी 4 वाजता

  • 9 मे पारनेर उपुख्यमंत्री अजित पवार सायंकाळी 6 वाजता

  • 9 मे पाथर्डी येथे आमदार नितेश राणे यांची पाथर्डी येथे भव्य रॅली

  • 9 मे पाथर्डी येथे आमदार नितेश राणे यांची शेवगाव येथे भव्य रॅली

  • 10 मे श्रीगोंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरीत्य सिंधिया यांची जाहीर सभा सकाळी 11 वाजता

  • 10 मे पाथर्डी पंकजा मुंडे यांची जाहीर सभा वेळ निश्चित नाही

  • 11 मे रोजी अहमदनगर शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य रॅली होणार असून त्यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे.

Sambhajinagar News: बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड बायपास परिसरात कोट्यावधीच्या जमिनीच्या वादातून सलग दुसऱ्यांदा दहशत वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. सहारा सिटी समोरील जवळपास 38 हजार स्क्वेअर फुट जमीन बळकावण्यासाठी 8 दिवसात दुसऱ्यांदा 60 ते 70 जणांनी मजुरांवर हल्ला केला आहे.

शिवाय सुरू असलेल्या बांधकाम दोन जेसीबीच्या सहाय्याने पाडून मजुरांच्या 9 दुचाकी जाळल्या आहे. त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान या प्रकरणी संजय चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून योगेश उर्फ बबलू पठाडे, शरद पवार, ज्ञानेश्वर आवारे, समीर दांडगे, अनंत खिल्लारे यांच्यासह इतर 60 ते 70 जणांच्या जमावाविरुद्ध दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमानुसार या हल्लेखोरा विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Sabha : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

ठाणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आज नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ऐरोली येथील श्री राम विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता ही सभा होणार असून या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Lok Sabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून १०० टक्के मतदान करावे, यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' हे मतदान जागृती अभियान हाती घेत समाजातील ज्येष्ठ मंडळींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

या अभियानाचे प्रमुख यशवंत घारपुरे, मुकुंद पुराणिक, महाबळेश्वर देशपांडे, मुकुंद क्षीरसागर, हेतल बारोट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अभियानात हेमंत कुमार, सीए सतीश घाटपांडे, रवींद्र महाजन, एस. एन. चंद्रचूड, बी. आर. देशपांडे, हरीश रूनवाल, हेमंत पांचाळ, सतीश घाटपांडे आदी सदस्य कार्यरत आहेत.

यशवंत घारपुरे म्हणाले, "मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे प्रमुख माध्यम आहे. मात्र, मतदार मतदानाच्या दिवशी सुटी घेऊन फिरायला जातात. लागून सुट्ट्या आल्या असल्या, तरी लोकांनी मतदान करून मग फिरायला गेले पाहिजे."

Sambhajinagar News: भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि आता सुरू असलेल्या उन्हाच्या तडक यामुळे उन्हाची लाट याचा फटका भाज्यांना बसला आहे. लवकर भाज्या खराब होत असल्याने भाजी मंडईत फळ भाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपये पर्यंत वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी १२० रुपये किलोने विक्री होणाऱ्या भाज्या आता १८० रुपये किलोने विकल्या जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरातील जाधव मंडी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याचा चित्र दिसून येत आहे.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांविरोधात रचला होता मोठा कट, मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांविरोधात रचला होता मोठा कट, भाजप नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे मोहित कंबोज यांचा रोख

या गटात एका माजी पत्रकाराचाही समावेश. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश.

याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार, मोहित कंबोज

Baramati Lok Sabha: बारामतीत आज प्रचारसभांचा धुरळा उडणार, शरद पवार, अजित पवार जंगी सभा घेणार

लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील प्रचाराचा धुराळा उडणार आहे. बारामतीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. शरद पवार ३ तर अजित पवार ५ सभा घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com