Viral News: 'अपनी तो जैसे तैसे कट जाएगी...' गाण्यावर डान्स करताना अधिकाऱ्याचा मृत्यू, Video व्हायरल

Bhopal news: एका सांस्कृतिक कार्यक्रमात पोस्ट ऑफिस विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कुमार दीक्षित यांचा डान्स करताना मृत्यू झाला आहे.
Viral Video
Viral Videosaam tv

Viral Video: व्यायाम करताना, क्रिकेट खेळताना, जेवण करताना किंवा बसल्या बसल्या अचानक मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे सतत समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात पोस्ट ऑफिस विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कुमार दीक्षित यांचा डान्स करताना मृत्यू झाला आहे.

सुरेंद्र कुमार दीक्षित हे एका कार्यक्रमात 'अपनी तौ जैसे तसै कट जाएगी, आपका क्या होगा जनाबे आली' या गाण्यावर डान्स करत होते. यादरम्यान ते अचानक कोसलळे आणि पुन्हा उठलेच नाही. यानंतर तेथील लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही संपूर्ण घटना 16 मार्च रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video
Accident News: रॉन्ग साईडला वेगात आले, स्कॉर्पिओला धडकताच हवेत उडाले; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO पाहाच!

कोरोना विषाणूच्या लाटेनंतर देशात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. धडधाकट लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि काही क्षणात त्याचा मृत्यू होतो असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर यापूर्वी देखील व्हायरल झाले आहेत. आता टपाल विभागाचे सहाय्यक संचालक डान्स करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Viral Video)

Viral Video
Video: हाफ तिकिटवाल्यांमुळं एसटी फुल्ल! कंडक्टर बनला सुपर हीरो, तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार टपाल विभागाने अखिल भारतीय पोस्टल हॉकी स्पर्धेचे आयोजन केले होते. भोपाळमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर 13 ते 17 मार्च दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

17 मार्चला अंतिम सामना खेळवायचा होता त्याच्या एक दिवस आधी 16 मार्चच्या संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी भोपाळ डॉक सर्कल ऑफिसमध्ये तैनात असिस्टंट डायरेक्टर सुरेंद्र कुमार दीक्षित हे सहकार्‍यांसोबत डान्स करत होते. यावेळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते खाली कोसळले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com