Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Vijay Wadettiwar News : विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam Digital

विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे शाब्दीक चकमक झाल्यांच पहायला मिळालं.

विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे वडेट्टीवारांच्या निवास्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज सायंकाळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले आणि एकच घोषणा द्यायला सुरुवात केली. विजय वडेट्टीवार यांचा पुतळाही जाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात होता, त्यामुळे आत प्रवेश करता आलं नाही.

विजय पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा वक्तव्य करू नये जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ असा इशाराही भाजपा युवा मोर्चाच्या शिवानी दानी यांनी दिलाय. विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार जोरात असताना नागपुरातील निवासस्थानी उपस्थित नव्हते. इतकी महत्त्वाची माहिती विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती. तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य का करतात असा सवालही भाजपा युवा मोर्चा कडून उपस्थित करण्यात आला.

Vijay Wadettiwar
Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर एका पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवलं आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे.

Vijay Wadettiwar
Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com