Mumbai Marathi People Jobs: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण
Mumbai Marathi People JobsGoogle

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Marathi people not welcome Job Post : मराठी लोकांना घर, नोकरी नाकारणं, असे प्रकार वारंवार घडतात. आता आणखी एक संतापजनक, असा प्रकार समोर आलाय. एका महिनेनं नोकरीसाठी जाहिरात पोस्ट शेअर करताना 'मराठी व्यक्ती चालणार नाही', असं स्पष्ट लिहिलंय. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे आणि ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केलाय.
Published on

मुंबई : मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही,अशी पोस्ट फ्रीलान्स एचआर रिक्रुट कंपनीने सोशल मीडियावर केली. एका ग्राफिक कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर हवा यासाठी ही पोस्ट करण्यात आली होती, पण या नोकरीसाठी मराठी व्यक्ती चालणार नसल्याचं पोस्टमध्ये एचआरने म्हटलं. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिजन्सने या रिक्रुटमेंट एजन्सीवर टीका केलीय.

गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटर आणि सल्लागार कंपनीने नोकरीची पोस्ट केली होती. ग्राफिक डिझायनरच्या पोस्ट ही जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. परंतु या नोकरीच्या जाहिरातीमध्ये मराठी पीपल आर नॉट अलाऊड असं लिहिण्यात आलं होतं. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिजन्सने या रिक्रुटमेंट एजन्सीवर टीका केलीय. आता राजकीय नेत्यांनीही यावर तीव्र शब्दात टीका केलीय. मनसे आणि ठाकरे गटासह अनेक राजकीय पक्षांनी कंपनीवर टीका केलीय. दरम्यान सोशल मीडियावर टीका होत असताना कंपनीकडून आणि एचआरकडून माफी मागण्यात आलीय. नेटकऱ्यांकडून टीका झाल्यानंतर कंपनीने नोकरीची जाहिरात सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हटवलंय.

दरम्यान याप्रकरणी राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देताना कंपनीवर टीका केलीय. याबाबत बोलतांना सुषमा अंधारे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला. ज्यावेळेला एखादी जाहिरात येते तीही विशेषतः सुरत बेस कंपनीकडून येते आणि marathi people are not allowed असं सांगितलं जातं. महाराष्ट्रातल्या एका माणसाला महाराष्ट्रातच मराठी पेपर नॉट अलाऊड असे बोर्ड लावले जातात. त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारलं पाहिजे.

कारण ३७० चा मुद्द्यावरून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी ३७० च्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा. पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होतायत, मराठी माणसाचे रोजगार कसे जातायत यावर मराठीच्या अस्मितेचा राजकारण करणारे लोक कधी तोंडं उघडणार हा खरा प्रश्न आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

शरद पवार गटाचे नेते राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिलीय. मुंबईत राहून मराठी माणसाचा द्वेष. धडा शिकवा, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी केलीय. लोकांची दिशाभूल करण्यासाठी निवडणूकांमध्ये असं होत आहे. राज्यातला उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याचाही अपप्रचार होतोय, असं काही खरं नाही. राज्यात उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणूकीत महाराष्ट्र एक नंबरला आहे, त्यासाठी समतोल विकास व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.

Mumbai Marathi People Jobs: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण
Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com