Railway Crime News Saam Tv
देश विदेश

Railway Crime News: जनरल तिकीट घेऊन एसी कोचमध्ये चढली महिला, संतापलेल्या टीटीईने केलं असं कृत्य, जाणून बसेल धक्का

Satish Kengar

Railway Crime News:

दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे झेलम एक्सप्रेसच्या टीटीईवर एका महिलेला ट्रेनमधून फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला जनरल क्लासचे तिकीट घेऊन झेलम एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये चढली होती.

यानंतर टीटीईला इतका राग आला की त्याने महिलेला ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले, असं सांगितलं जात आहे. महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली होती, अशी माहिती आहे. पोलिसांची त्या महिलेवर नजर पडली. पोलिसांनी तात्काळ साखळी ओढून महिलेचे प्राण वाचवले. महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी महिला 29 फेब्रुवारी रोजी फरिदाबादहून झेलम एक्सप्रेसमध्ये चढली होती. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी तिला झाशीला जायचे होते, असे महिलेचे म्हणणे आहे. ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा ट्रेन निघत असताना ती चालत्या ट्रेनमध्ये चढली. ट्रेनचा जनरल डब्बा पुढे गेला होता.  (Latest Marathi News)

ही महिला कशीतरी एसी डब्ब्यात चढण्यात यशस्वी झाली. टीटीईने महिलेला एसी कोचमध्ये तिकीट मागितले असता तिने टीटीई ला सर्व काही सांगितले. महिलेचे म्हणणे आहे की, ती दंड भरण्यास तयार होती. मात्र चिडलेल्या टीटीईने अचानक महिलेला चालत्या ट्रेनमधून बाहेर धक्का दिला. महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली होती.

दरम्यान, जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेच्या तक्रारीवरून टीटीईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टीटीईने महिलेचे सामानही ट्रेनमधून फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT