NYPD Police Woman: महिला पोलीस अधिकारीचा विवस्त्र फोटो व्हायरल, संपूर्ण विभागावर दाखल केला खटला

NYPD Police Woman Crime News: न्यूयॉर्क पोलिसांच्या एका महिला अधिकाऱ्याने तिच्या विभागाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या महिला अधिकारीचा विवस्त्र फोटो तिच्या सहकाऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.
NYPD Police Woman Crime News
NYPD Police Woman Crime NewsSaam Tv
Published On

NYPD Police Woman Crime News:

न्यूयॉर्क पोलिसांच्या एका महिला अधिकाऱ्याने तिच्या विभागाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या महिला अधिकारीचा विवस्त्र फोटो तिच्या सहकाऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे. महिला अधिकारी सांगतात की, तिने हा फोटो तिचा एक्स बॉयफ्रेंड लेफ्टनंट मार्क रिवेराला 12 वर्षांपूर्वी पाठवला होता.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, या प्रकरणामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाल्याचे या महिला पोलीस अधिकारीने सांगितलं आहे. 34 वर्षीय या महिलेने कोर्टात हा खटला दाखल केला आहे. 2012 मध्ये ती पोलीस दलात दाखल झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NYPD Police Woman Crime News
Kanjurmarg to Badlapur Metro: कांजूरमार्ग ते बदलापूर धावणार मेट्रो? मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य

पीडित महिलेने दावा करत म्हटलं आहे की, ती आणि लेफ्टनंट रिवेरा नोकरीवर रुजू झाल्यानंतर काही महिने डेट करत होते. लेफ्टनंट रिवेरा यांनी ग्रुपमध्ये तिचे टॉपलेस फोटो इतर कर्मचाऱ्यांसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला.

पीडित महिलेने दावा केला आहे की, युनियन प्रतिनिधींनी तिचा खटला दाखल करू नये अशी विनंती कोर्टाला केली होती. एका रिपोर्टनुसार, युनियनच्या एका प्रतिनिधीने पीडितेला सांगितले की, तू पहिली किंवा शेवटची महिला नाहीस जिच्यासोबत हे घडले आहे.

NYPD Police Woman Crime News
Sadhvi Pragya: 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

महिला पोलिसाचा दावा आहे की, तिचे विवस्त्र फोटो न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या ग्रुप चॅट्स आणि टेक्स्ट मेसेज चेनमध्ये शेअर करण्यात आले होते. यामध्ये तिच्या पालकांच्या पत्त्यांसारख्या वैयक्तिक माहितीचाही समावेश होता. दरम्यन, याप्रकरणी गुन्हा दाखल झालं असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com