Kanjurmarg to Badlapur Metro: कांजूरमार्ग ते बदलापूर धावणार मेट्रो? मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य

Cm Eknath Shinde: कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोचे काम लवकरच सुरु होणार आहे. याचबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वक्तव्य केलं आहे.
Kanjurmarg to Badlapur Metro
Kanjurmarg to Badlapur MetroSAAM TV
Published On

>> अभिजित देशमुख

Cm Eknath Shinde:

कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोचे काम लवकरच सुरु होणार आहे. याचबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वक्तव्य केलं आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो देखील प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.

''आम्ही मगरीचे अश्रु ढाळत नाही तर, शेतकऱ्याचे अश्रु पुसतो. आज आंदोलनकर्त्यांना देखील सरकारवर विश्वास वाटतो. कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला तो पूर्ण केला. आता मराठा तरुणांना भरतीमध्ये देखील आरक्षण मिळणार. दिलेला शब्द पाळण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आम्ही घरात बसून काम करत नाही. हे जनता जनार्दणाचे शासन आहे. आपल्या दारात म्हणूनच आम्ही आरोपांना आरोपांनी नाही तर कामातून उत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार डॉ श्रीकांत शिंदे ,आमदार राजू पाटील, किसन कथोरे, कुमार आयलानी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kanjurmarg to Badlapur Metro
Sadhvi Pragya: 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम लोकांचा हिताचा उपक्रम लोकांच्या जीवनात बदल घडवणारा उपक्रम आहे. लाभार्थ्याला लाभ मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत होते, शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत होती. कागदपत्र जमा करावे लागत होते, त्यामुळे लाभार्थी नाद सोडून जायचा. मात्र हे सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही योजना सुरू केली. आज चार कोटीहून अधिक लाभार्थी झालेत.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यत 45 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि 25 हजार लोकांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगितले. कल्याण शीळ मार्गातील जमीन मालकांना मोबदला देणार, कानजुरमार्ग बदलापूर मेट्रोच्या लाइनवर सरकार काम करत आहे. डीप क्लीन ड्राइव्हच्या माध्यमातून शहराची स्पर्धा लावली आहे. स्वच्छ प्रदूषण मुक्त शहर व्हावे यासाठी सरकार काम करत आहे. म्हणूनच सरकारला लोकांचा पाठिंबा मिळत आहे.

Kanjurmarg to Badlapur Metro
PM मोदींनी पार्टी फंडात दिली देणगी, जाणून घ्या किती रक्कम दिली

शिंदे म्हणाले, हे सरकार आज पडेल उद्या पडेल ,परवा पडेल ,तेरवा पडेल अशा प्रकारचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक चांगली चपराक तुमच्या माध्यमातून देण्याची संधी आम्हाला मिळाली. कारण हे सरकार मजबूत आहे अजित पवार देखील आपल्या सरकारमध्ये सामील झालेत. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि सरकारच्या विकास कामांवर ते देखील आपल्या सोबत आलेत.

'कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो देखील प्रस्तावित'

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोजा मेट्रो 12 चे ऑनलाईन भूमीपुजन केलं. तसेच कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो देखील प्रस्तावित असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पायाभूत पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक ,जीडीपी मध्ये नंबर, एक परकीय गुंतवणूक नंबर एक ,महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचे शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com