Woman Gets Husband Arrested 7 Times Shocking News in Gujarat  Saam TV
देश विदेश

Shocking News: बायकोने १० वर्षात ७ वेळा नवऱ्याला तुरुंगात पाठवलं, प्रत्येकवेळी स्वत:च सोडवून आणलं; कारण चक्रावणारं

Husband Wife Clash: एका पत्नीने १० वर्षात तब्बल ७ वेळा आपल्या पतीला तुरुंगात पाठवल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे पती तुरुंगात गेल्यानंतर प्रत्येकवेळी पत्नीनेच जामीदार होऊन त्याची सुटका केली आहे.

Satish Daud

Gujarat Woman Gets Husband Arrested 7 Times: नवरा बायकोचा वाद होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा ते विकोपालाही जातात. याचाच प्रत्यय गुजरातमधील एका घटनेतून आला आहे. एका पत्नीने १० वर्षात तब्बल ७ वेळा आपल्या पतीला तुरुंगात पाठवल्याचं समोर आलं आहे.

विशेष बाब म्हणजे पती तुरुंगात गेल्यानंतर प्रत्येकवेळी पत्नीनेच जामीदार होऊन त्याची सुटका केली आहे. ही अजब घटना अहमदाबाद (Gujarat) शहरातील मेहसाना परिसरातून समोर आली आहे. सोनू माळी असं पत्नीचं नाव असून प्रेमचंद माळी असं पतीचं नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २००१ मध्ये सोनू आणि प्रेमचंद यांचा विवाह (Wedding) झाला होता. १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात कडूता निर्माण झाली. २०१५ साली पत्नी सोनू हिने पती प्रेमचंद याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत पहिला गुन्हा दाखल केला.

इतकंच नाही तर, आपल्याला पतीसोबत (Husband) राहायचं नाही, असं म्हणत तिने घटस्फोटासाठी अर्ज देखील केला. यावर सुनावणी देताना न्यायालयाने प्रेमचंद याने पत्नीला दरमहा २ हजार रुपये इतकी पोटगी द्यावी, असे आदेश दिले. रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रेमचंदला पत्नीला पोटगी देणे अशक्य झाले. त्यामुळे न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

प्रेमचंद यांने ५ महिने तुरुंगात घालवले. आश्चर्याची बाब म्हणजे पत्नी (Wife) सोनूने हमी घेत जामीवर त्याची सुटका केली. त्यानंतर कायदेशीररित्या विभक्त होऊनही प्रेमचंद आणि सोनू पुन्हा एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि प्रेमचंदने सोनूला मारहाण करण्यास सुरुवात केली.

सोनूच्या तक्रारीवरून (Crime News) २०१६ ते २०१८ या काळात प्रेमचंदला ४ वेळा अटक करण्यात आली. प्रत्येकवेळी काही दिवसांनी सोनूनेच त्याला जामीन मिळवून दिला. २०१९ आणि २०२० मध्येही प्रेमचंद पत्नीला पोटगी देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला आणखी दोनदा तुरुंगात जावे लागले. यावेळीही पत्नी सोनू हिनेच त्याला जामीन मिळवून दिला.

दरम्यान, पुन्हा दोघांमध्ये गोडवा निर्माण झाल्याने दोघे एकत्र राहू लागले. मात्र, २०२३ मध्ये पुन्हा प्रेमचंदकडून पत्नीला पोटगी मिळाली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागले. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा सोनूने त्याच्या जामीनाची व्यवस्था केली.

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रेमचंद हा पुन्हा पत्नीसोबत राहू लागला होता. आता पुन्हा दोघांमध्ये वाद झाला असून यावेळी प्रेमचंद याने पत्नीनेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT