Budhana Bus Accident Updates: समृद्धी महामार्ग बस अपघातानंतर RTO अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहिलीच मोठी कारवाई

Samruddhi Mahamarg Bus Accident: आरटीओने या अपघातास जबाबदार असलेल्या चालकावर मोठी कारवाई केली आहे.
samruddhi mahamarg bus accident
samruddhi mahamarg bus accidentSaam TV

Samruddhi Mahamarg Budhana Bus Accident: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) ३० जून २०२३ रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. नागपूरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला बुलढाण्यातील सिंदखेडराजा शिवारात अपघात होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत जवळपास २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान, आरटीओने या अपघातास जबाबदार असलेल्या चालकावर मोठी कारवाई केली आहे.

samruddhi mahamarg bus accident
Nashik Bus Accident: सप्तश्रृंगीगड घाटात ३५ प्रवाशांसह बस दरीत कोसळली; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

परिवहन विभागाने (RTO) बसचालक दानिश शेख याचा वाहनचालक परवाना रद्द केला आहे. मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी दानिश शेख याचं ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली आहे.

दानिश शेखला त्याचा परवाना रद्द करण्याच्या विरोधात अपील करण्याची संधी असेल, असंही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, सध्या त्याचा वाहनचालक परवाना (Driving License) रद्द करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात बसचालक दानिश शेख याच्याच चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे.

samruddhi mahamarg bus accident
Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली; थरकाप उडवणारी घटना

अपघातावेळी बस चालक शेख दानिश याने मद्यपान केल्याचं एका फॉरेन्सिक अहवालातून समोर आलं आहे. दानिश याच्या शरीरात मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३० टक्के जास्त होते, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अमरावती येथील रीजनल फॉरेंसिक सायन्स लँबोरिटिने यासंदर्भातला फॉरेन्सिक तपास केला आहे.

विशेष बाब म्हणजे बसचा अपघात (Bus Accident) हा टायर फुटल्याने झाला असा दावा बसचालक शेख दानिश याने केला होता. मात्र, एका खासगी फॉरेन्सिक संस्थेने त्याचा हा दावा फेटाळून लावला होता. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख याला अटक करून ताब्यात घेतलं असून त्याच्यावर आयपीसीचे कलम ३०४ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १३४,१८४ आणि २७९ लावण्यात आले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com