Vladimir Putin Saam TV
देश विदेश

देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? रशियाकडून घेणार कमी दराने कच्चे तेल

रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या संपुर्ण जगात इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

वृत्तसंस्था

देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझलचे दर (Petrol Diesel Rates) वाढत आहेत. याचे कारण रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सांगितले जात आहे. आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार भारत रशियाकडून कमी दरात कच्चे तेल (Crude Oil) विकत घेण्याच्या तयारीत आहे. तशी बोलणी भारताकडून केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या माहितीनुसार भारताची मागणी आहे की रशियाने भारताला ७० डॉलर प्रती बॅरल दराने कच्चे तेल द्यावे. तज्ञांचा दावा आहे की जर रशियाने भारताला ७० डॉलर प्रती बॅरल दराने कच्चे तेल दिले तर भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घट होईल.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या संपुर्ण जगात इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. सध्या कच्च्या तेलाची प्रती बॅरल किंमत १५० डॉलरच्या आसपास आहे. हिच किंमत रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरवातीच्या काळात १३० डॉलर प्रती बॅरल होती. या विषयीचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी सांगितले की भारत तेल उत्पादक असलेल्या रशियासोबत मोठी डील करणाच्या तयारीत आहे. कारण अन्य तेल खरेदी करणारे देश रशियाकडून तेल घेण्यास नकार देत आहेत.

अद्याप सरकारचे भाष्य केलेले नाही

सूत्रांनी ब्लूमबर्गला सांगितले की कच्चे तेल खरेदी करण्यासाठी फंडिंगची गरज आहे, भारत त्यातून मार्ग शोधत आहे. ब्लूमबर्ग म्हणाले की, भारत सरकारने यावर भाष्य केलेले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या तेल आयातदारातील सरकारी आणि खाजगी रिफायनर्सनी ४० दशलक्ष बॅरलहून अधिक रशियन क्रूड खरेदी केले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित ब्लूमबर्गच्या गणनेनुसार, संपूर्ण २०२१ मध्ये रशियातून भारतात येणाऱ्या तेलाच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के जास्त आहे.

भारत 85 टक्के तेल आयात करतो

भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. रशियाकडून इंधन खरेदीदारांपैकी भारत एक आहे. तेलविक्री हा पुतिन यांच्या राजवटीचा मोठा महसूल आहे. युरोपियन मागणी कमी झाल्यामुळे रशियाच्या तेल उद्योगावर गंभीर दबाव येत आहे. यावर्षी सरकारच्या उत्पादनात १७ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील तज्ञांचे म्हणणे आहे की जर रशियाने किंमतींची मागणी मान्य केली आणि भारताला तेल वितरित केले तर भारत सरकारचे रिफायनर्स एका महिन्यात सुमारे १.५ दशलक्ष बॅरल तेल घेऊ शकतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT