तुमचा EMI वाढणार; आरबीआयच्या 'या' निर्णयामुळे कर्जदारांना झटका

RBI Interest Rate Hike: अनेक महिने रेपो दर ४ टक्क्यांवर होता, आता रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली आहे.
RBI Interest Rate Hike
RBI Interest Rate HikeSaam Tv
Published On

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक दिवसानंतर बुधवारी रेपो दर वाढवण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दर एका झटक्यात ०.४० टक्क्यांनी वाढून ४.४० टक्के झाला आहे. त्यामुळे स्वस्तात मिळणारे कर्ज आता मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे लोकांवर ईएमआयचा बोजा वाढवणार आहे. (RBI Interest Rate Hike)

रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. रेपो दरात ०.४० टक्क्यांना वाढ केली असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दास यांनी जाहीर केले. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. हा निर्णय अनियंत्रित महागाईमुळे एमपीसीने घेतला असल्याचे दास यांनी सांगितले.

RBI Interest Rate Hike
भारतात रूग्णांना कोविड लढ्यासाठी मिळणार लोन सुविधा: आरबीआय ची घोषणा  

मार्च २०२२ मध्ये महागाई झपाट्याने वाढली आणि ७ टक्क्यांवर पोहोचली. किरकोळ महागाई, अन्नधान्यांची महागाई झपाट्याने वाढली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. याचा जागतिक पुरवठा साखळीवरही वाईट परिणाम झाला आहे, असंही दास म्हणाले.

रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीने रेपो दर तसेच कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) ०.५० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय मध्यम कालावधीत आर्थिक इकॉनॉमिक ग्रोथ बळकट करण्यासाठी घेण्यात आला आहे. रेपो रेट वाढवण्याव्यतिरिक्त, रिझर्व्ह बँक एमपीसीने देखील अनुकूल चलनविषयक धोरण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, असंही गव्हर्नर दास यांनी सांगितले. (RBI Interest Rate Hike)

हे देखील पाहा

सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार

दरम्यान रेपो दर वाढल्याने सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. अगोदरच महागाईने होरपळत असलेल्या सामान्य जनतेला आता ईएमआयने पुन्हा कात्री लागणार आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोनसह सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत. यामुळे ईएमआयची रक्कम वाढणार आहे. (RBI Interest Rate Hike)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com