marriage Google
देश विदेश

Shocking Crime: लग्नानंतर पती मुंबईत नोकरीच्या शोधात, पत्नीचं दिरासोबत गुलूगुलू; अखेर दोघांनी...

Woman Marries Brother-in-Law: पती कामानिमित्त मुंबईत असतानाच नवविवाहित पत्नीनं दिरासोबत लग्नगाठ बांधली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चर्चेला सुरुवात झाली असून, खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. नवविवाहित महिलेनं पती मुंबईला गेल्यानंतर दिराशी लग्न केलं आहे. महिलेचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाच्या एका महिन्यानंतर पती कामाच्या शोधात मुंबईत गेला. त्यानंतर महिलेचं दिरासोबत सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयु्ष्याला सुरूवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

गोरखपूरमधील सहजनवा येथील रहिवासी खुशबूचे लग्न हरिहरपूरच्या कल्लूशी झाले होते. लग्नानंतर कल्लू नोकरीच्या शोधात मुंबईला गेला होता. त्यानंतर खुशबू आणि तिच्या दिरामध्ये जवळीक वाढली. दोघेही अधिक वेळ एकत्र घालवत होते. कुटुंबाला याची कुणकुण लागताच त्यांनी घरातून पळ काढला. नंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत दोघांना घरी परत आणले. मात्र दोघेही एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते.

अखेर कुटुंबानेही त्यांच्या विवाहाला संमती दिली. हा विवाह हरिहरपूर नगरपंचायत कार्यालयात झाला. नगरपंचायत अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही यांनी स्वतः हा विवाह विधी पार पडल्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक नेते, नगरसेवक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. खुशबूच्या पूर्व पतीने विवाहाला हजेरी लावण्यास नकार दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT