Vinesh Phogat Saam Tv
देश विदेश

Vinesh Phogat : विनेश फोगाट यांनी निवडणूक लढवण्याआधी सरकारी नोकरीचा राजीनामा का दिला? नियम काय सांगतो, घ्या जाणून

Why Wrestler Vinesh Phogat Resign From Railway Job : कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी राजकारणात येण्याअगोदर रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. एखाद्या सरकारी नोकरी करत असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येवू शकते का? हे आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काल ६ ऑगस्ट रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोघेही हरियाणा विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र, राजकारणात येण्यापूर्वीच विनेश फोगट यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. फोगाट यांनी रेल्वेच्या सरकारी नोकरीचा राजीनामा का दिलाय? हा प्रश्न सर्वांना पडत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखणारा नियम कोणता आहे, हे माहीत आहे का? या नियमाविषयी आज आपण सविस्तर जाणून घेवू या.

राजकारणात येण्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी रेल्वेची नोकरी सोडलीय. विनेश फोगाट रेल्वेमध्ये ओएसडी पदावर होत्या. राजीनाम्याची घोषणा करताना विनेश यांनी X अकाउंटवर लिहिलं होत की, 'रेल्वे सेवा हा आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ (Why Wrestler Vinesh Phogat Resign) आहे. रेल्वे परिवाराची मी सदैव ऋणी राहीन. पण प्रश्न असा पडतोय की, विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी रेल्वेची नोकरी का सोडली? सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करणारा नियम कोणता आहे?

सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करणारा नियम

सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना केवळ निवडणूक लढविण्यासच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यात भाग घेण्यास देखील बंदी आहे. केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिकारी (Can Government Employee Contest Elections) आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक लढविण्यास बंदी आहे. नियम ५ मध्ये ही तरतूद करण्यात आलीय. या नियमांतर्गत कोणताही नागरी सेवक कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा भाग राहु शकत नाही. तसंच राजकारणाशीकिंवा कोणत्याही राजकीय चळवळीशी किंवा कार्याशी संबंधित असणार नाही.

आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात सहभागी होऊ न देणे, ही प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. तरीही असं झाल्यास संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला याबाबत सरकारला कळवावे (Vinesh Phogat Resign) लागेल. कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी प्रचार करू शकत नाही, किंवा त्याच्या प्रभावाचा वापर करू शकत नाही, असं नियमात नमूद करण्यात आलंय.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणता नियम?

केंद्र सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवण्यास किंवा राजकीय कार्यात सहभागी होण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीही देखील सारखाच नियम (Rules For Government Employee) आहे. राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी निवडणूक लढवू शकत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यात सहभागी होऊ शकत नाहीत. प्रत्येक राज्यात यासाठी वेगवेगळे नागरी नियम आहेत. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला राजकीय रॅलीमध्ये देखील सहभागी होता येत नाही. राजकीय सभेत ते ड्युटीवर असतील तर भाषण करू शकत नाहीत, घोषणा देऊ शकत नाहीत.

कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी पदावर असताना निवडणूक लढवू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असेल किंवा निवृत्त झाले असतील तेव्हाच त्यांना निवडणूक लढवता येवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT