मुंबई : हरियाणातून मोठी बातमी समोर येत आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपल्या X सोशल मिडिया अकाउंटवर ही माहिती दिलीय. कुस्तीपटू विनेश फोगाट भारतीय रेल्वेमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर कार्य करत होत्या.
X अकाउंटवर पोस्ट
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिलाय. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. X वर पोस्ट करताना विनेशने लिहिलंय की, भारतीय रेल्वेची सेवा करणे, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ (Vinesh Phogat Resigns railway job) आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.
विनेश फोगाटनं रेल्वेच्या नोकरीचा दिला राजीनामा
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. दरम्यान आता विनेश फोगाटने (Vinesh Phogat) नोकरीचा राजीनामा दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे विनेश यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी रेल्वेतील नोकरी सोडली, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
राज्यसभेवर पाठवण्याची मागणी
यंदा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट विधानसभेच्या रिंगणात उतरतील, अशा शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदक हुकल्यानंतर काँग्रेसने फोगट यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली (Haryana assembly election) होती. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षाचे नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी ही मागणी केलीय. मात्र, वयोमर्यादेमुळे फोगाट यांना राज्यसभेवर पाठवता आलं नसल्याचं समोर आलंय. या दोन्ही कुस्तीपटुंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला (congress) भारतीय जनता पक्षाविरोधात फायदा होऊ शकतो, असं बोललं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.