D. K. Shivakumar
D. K. Shivakumar saam tv
देश विदेश

DK Shivakumar Reaction : मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली, शिवकुमार यांच्या मनातलं आलं ओठांवर; अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय!

Nandkumar Joshi

DK Shivakumar Vs Siddaramaiah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्यानंतर मुख्यमंत्रिपद कुणाला? असा पेच निर्माण झाला होता. तो पेच सुटला असून, सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली.

मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले शिवकुमार यांची संधी हुकल्याने ते नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा होती. पण स्वतः शिवकुमार यांनी माध्यमांसमोर या चर्चेला पूर्णविराम दिला. (Latest Marathi News)

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावर गेल्या तीन-चार दिवसांपासून खलबतं सुरू होती. काँग्रेस हायकमांडपासून ते महत्वाच्या नेत्यांपर्यंत जोरबैठका सुरू होत्या. सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी 'शर्यत' सुरू होती. अखेर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्यांना झुकते माप दिले. तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे. (Political News)

काय म्हणाले शिवकुमार? (व्हिडिओ)

काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, यावर आता स्वतः शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तडजोड केली आहे किंवा आनंदी आहात का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवकुमार यांना विचारला. त्यावर मी कशाला नाराज होऊ? असा प्रतिप्रश्न करून चर्चेला पूर्णविराम दिला.

जेव्हा जनता तुम्हाला मोठा कौल देते, तर नक्कीच आम्ही आनंदी असायला हवं आणि जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायला हवीत. हाच आमचा प्रमुख उद्देश आणि अजेंडा आहे. मी कशाला नाराज असेल? अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं शिवकुमार यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Renuka Shahane Post : "....तर त्यांना मत देऊ नका"; 'नोकरीत मराठी माणूस नको'च्या पोस्टनंतर रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

बारामती लाेकसभा मतदारसंघात मंगळवारी रात्री तिघांकडून हवेत गोळीबार, नागरिकांत घबराहट

Buldhana Accident News: धक्कादायक! अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ पादचारी महिलांना चिरडलं

Rat Killer Plants : उंदीर मारण्यासाठी औषधाची गरज नाही; घरात 'हे' झाड लावल्यास सर्व उंदीर पळून जातील

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT