Karnataka New Cm : कर्नाटकचा राजकीय पेच सुटला; सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकचा राजकीय पेच सुटला; सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री
Congress declares Siddaramaiah as next Karnataka CM
Congress declares Siddaramaiah as next Karnataka CMSaam Tv

Congress declares Siddaramaiah as next Karnataka CM : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता हा गोंधळ संपला आहे. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री (karnataka cm) कोण असणार हे स्पष्ट केलं आहे.

सिद्धरामय्या (Siddaramaiah ) हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने याबाबत माहिती जाहीर केली आहे.  (Breaking News)

Congress declares Siddaramaiah as next Karnataka CM
Who Is Siddaramaiah: मुख्यमंत्रिपद मिळवणारे सिद्धरामय्याच कर्नाटकच्या राजकारणातील 'किंग'! खरगेंनाही दिला होता धोबीपछाड

पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची नावे जाहीर केली. ते म्हणाले की, सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा त्यांनी केली.

काँग्रेसच्या या घोषणेनंतर डीके शिवकुमार यांनीही याबाबत एक फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांचा आणि कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हातपकडून काँग्रेसमध्ये सर्व ठीक आहे, असं दाखवत आम्ही एकसोबत आहोत हे दर्शवत आहेत.  (Latest Political News)

Congress declares Siddaramaiah as next Karnataka CM
Bailgada Sharyat: मोठी बातमी! बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टूला सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींच्या लढ्याला यश

हा फोटो शेअर करताना डीके शिवकुमार यांनी लिहिलं आहे की, "कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि आमच्या लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही याची हमी देण्यासाठी एकत्र आहोत."

पक्षाचे प्रदेश प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी घोषणा केली, 20 रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमदारांना मंत्रपदाची शपथ दिली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com