Who Is Siddaramaiah: मुख्यमंत्रिपद मिळवणारे सिद्धरामय्याच कर्नाटकच्या राजकारणातील 'किंग'! खरगेंनाही दिला होता धोबीपछाड

Siddaramaiah Political Journey : सिद्धरामय्या यांना कर्नाटकच्या राजकारणाचे 'जादूगार' म्हटले जाते आणि त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या या बिरुदाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे.
Karnataka New CM Siddaramaiah
Karnataka New CM Siddaramaiahsaam tv

Karnataka New CM Siddaramaiah: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत डीके शिवकुमार यांना धोबीपछाड देत सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद (Karnataka CM) मिळवले आहे. राजकीय खेळींमध्ये तरबेज असलेले सिद्धरमय्या यावेळी डी के शिवकुमार (DK Shivkumar) यांची बाजू भक्कम असतानाही त्यांच्यावर भारी पडले आहे.

सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना कर्नाटकच्या राजकारणाचे 'जादूगार' म्हटले जाते आणि त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या या बिरुदाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. एवढंच नाही तर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगें यांना देखील ते एकेकाळी भारी पडले होते.

कोण आहेत सिद्धरामय्या?

लोकदलाच्या तिकीटावर विजय मिळवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या राजकारणातील निष्णात खेळाडू राहिले आहेत. योग्य शॉट मारण्याच्या बाबतीत त्यांचे टायमिंग इतके जबरदस्त आहे की त्यांचे विरोधकही त्यांचे कौतुक करतात. अनेकदा परिस्थिती बाजूने नसतानाही सिद्धरामय्या यांनी यश संपादन केले आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, हायकमांडचे सर्वात विश्वासू आणि पक्षाचे सर्वात श्रीमंत नेते डी के शिवकुमार यांना मागे धोबीपछाड देत मुख्यमंत्रीपद मिळवले आहे.

Karnataka New CM Siddaramaiah
Bailgada Sharyat: मोठी बातमी! बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टूला सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींच्या लढ्याला यश

दुसऱ्या पक्षातून येऊन काँग्रेसमध्ये बनले 'किंग'

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याधी मोठा संघर्ष केला आहे. सर्वप्रथम लोकदल, नंतर जनता दल, जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि नंतर काँग्रेस अशा प्रत्येक पक्षात त्यांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी बाजूला केले. यावेळीही त्यांनी त्यांच्या 10 वर्षांपूर्वीच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला आहे. वर्तमान स्थितीत कर्नाटक काँग्रेसमध्ये कोणतेही पद नसताना सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आहे.

मल्लिकार्जुन खरगेंनाही पडले होते भारी

मल्लिकार्जुन खरगे 2013 च्या विधानसभेत कर्नाटकात काँग्रेसचे मुख्यमंत्री होणार होते. परंतु त्यानंतर अवघ्या सात वर्षांपूर्वी एचडी देवेगौडा यांच्या पक्षातून हकालपट्टी झालेले सिद्धरामय्यांनी त्यांना मागे टाकत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. त्यावेळीही काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दोन मोठे दावेदार होते. सर्वात मोठा दावा तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा होता, तर सिद्धरामय्या हे दुसरे दावेदार होते. या शर्यतीत एम. वीरप्पा मोईली आणि तत्कालीन कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जी. परमेश्वरा यांचीही नावं होती. मात्र अंतिम टप्प्यात खर्गे मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना सिद्धरामय्यांनी अचानक डाव पलटवला आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले.

खर्गेंपेक्षा जास्त आमदारांचा मिळवला होता पाठिंबा

तत्कालीन काँग्रेस हायकमांडने एके अँटोनी, मधुसूदन मिस्त्री, लुइजिन्हो फालेरो आणि जितेंद्र सिंग यांना निरीक्षक म्हणून कर्नाटकात पाठवले होते. यांनी जिंकलेल्या सर्व 121 आमदारांशी चर्चा केली. यानंतर गुप्त मतदान झाले आणि काँग्रेस हायकमांडने गुप्त मतदानाद्वारे जे नाव ठरवले ते सिद्धरामय्या यांचे होते. त्यांना खरगें आणि इतर नेत्यांपेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या विजयी झाले. (Breaking News)

Karnataka New CM Siddaramaiah
Cabinet Reshuffle: मोठी बातमी! किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास

- सिद्धरामय्या हे नऊ टर्म आमदार आहेत. त्यांनि वरुणा मतदारसंघात या निवडणुकीत ४६,१६३ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

- सिद्धरामय्या यांनी कर्नाटक विधानसभेत म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. 1983 मध्ये अपक्ष, 1985 मध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर, 1994 आणि 2004 मध्ये जनता दल आणि 2006 मध्ये कॉंग्रेसकडून लढून 257 मतांच्या फरकाने ते विजयी झाले. (Latest Political News)

- सिद्धरामय्या यांनी 2018 मध्ये वरुणा मतदारसंघाची जागा त्यांचा मुलगा एस यथिंद्रा यांच्यासाठी सोडली आणि त्यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी मतदारसंघातून निवडणूक लढवली.

- चामुंडेश्वरीमध्ये ते जेडीएसचे उमेदवार जीटी देवेगौडा यांच्याकडून पराभूत झाले, तर बदामीमध्ये त्यांनी भाजपच्या बी श्रीरामुलू यांचा 1996 मतांच्या फरकाने पराभव केला.

- 2023 च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असेल असे ठामपणे सांगितले होते. “मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार आहे” असे ते वारंवार सांगत होते.

- सिद्धरामय्या हे कर्नाटकातील तिसरा सर्वात मोठी वर्ग असलेल्या कुरुबा समाजातील आहेत आणि त्यांनी यापूर्वी AHINDA (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलितांसाठी कन्नड संक्षिप्त रूप) संमेलनांचे नेतृत्व केले आहे.

- जेडीएसचे माजी राज्य युनिट प्रमुख सिद्धरामय्या यांना पक्षातून काढून टाकण्यात आले, त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी समर्थकांसाह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com