Siddaramaiah Vs Shivakumar: ७५ वर्षांचे सिद्धरामय्या शिवकुमारांवर पडले 'भारी'!, जाणून घ्या खास ५ गोष्टी

जाणून घेऊया सिद्धरामय्या यांनी डीके शिवकुमार यांना कसे मागे टाकले...
Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK Shivakumar
Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK ShivakumarSAAM TV

Karnataka News Update: कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदावरील सस्पेंस अखेर संपला आहे. सिद्धरामय्या 20 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महत्त्वाचे मंत्रिपद देण्याचे आश्वासनही हायकमांडने दिले आहे. (Latest Marathi News)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवत दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री कोणाला करायचे, हे काँग्रेसपुढे मोठं आव्हान होतं. अखेर हायकमांडने सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार आहे. चला जाणून घेऊया सिद्धरामय्या यांनी डीके शिवकुमार यांना कसे मागे टाकले...

Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK Shivakumar
Truck Carrying Cash Breaks Down: बाबो! 535 कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक अचानक बंद पडला, आजूबाजूला गर्दी जमू लागली अन् मग...

सामाजिक न्यायाचा चेहरा

सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे बडे नेते आहेत. कर्नाटकात भाजपच्या हिंदुत्व कार्डाचा सामना करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ओबीसी (OBC) आणि दलित कार्ड खेळले. राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते की, पंतप्रधानांना ओबीसींना सत्ता द्यायची असेल तर आधी त्यांना समजून घ्यावं लागेल की देशात किती ओबीसी आहेत. हेच कळत नसेल तर त्यांना सत्ता कशी देणार?

सिद्धरामय्या हे देखील ओबीसी आहेत. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत ओबीसी मते आपल्या बाजूने जिंकण्यासाठी काँग्रेसकडे सिद्धरामय्या यांच्यापेक्षा चांगला चेहरा नव्हता. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री असताना गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या होत्या, त्यामुळे ते राज्यातील सामाजिक न्यायाचा चेहरा म्हणून उदयास आले. (Political News)

प्रत्येक समाजाकडून पाठिंबा

सिद्धरामय्या जरी ओबीसी नेते असले तरी त्यांना दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजातचा मोठा पाठिंबा आहे. 2013 ते 2018 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या. त्यांनी अन्न भाग्य योजना सुरू केली, ज्या अंतर्गत गरिबांना 7 किलो तांदूळ देण्यात आले. याशिवाय त्यांनी इंदिरा कॅन्टीन सुरू केले. गरोदर महिलांसाठी मातृपूर्ण योजना सुरू केल्या. एवढेच नाही तर राज्यातील गरिबांसाठी 7 लाख घरे बांधण्याची योजनाही सुरू केली. त्यामुळे प्रत्येक समाजाकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.

सिद्धरामय्या यांचे अहिंदा कार्ड

काँग्रेसला सिद्धरामय्या यांच्या 'अहिंदा' कार्डचा मोठा फायदा झाला. अहिंदा म्हणजे अल्पसंख्याक, ओबीसी, दलित. या तिघांना मिळून कर्नाटकात अहिंदा म्हणतात. या विधानसभा निवडणुकीत अहिंदा यांनी काँग्रेसला (Congress) मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला हा ट्रेंड कायम ठेवायचा आहे.

सिद्धरामय्या यांची कारकीर्द

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 12 निवडणुका लढवल्या, त्यापैकी 9 जिंकल्या. सिद्धरामय्या 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. यापूर्वी ते 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला. या काळात त्यांची प्रशासकीय जबाबदारी चांगली होती. यामुळेच पक्षाने त्यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा जास्त महत्त्व दिले.

Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK Shivakumar
Shevgaon Bandh News : शेवगाव पाचव्या दिवशीही बंद, आज मूक मोर्चा; एकूण 44 अटकेत

मोफत योजना राबविण्याचे आव्हान

काँग्रेसने निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासन दिले होते. आता राज्यात लवकरच काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. अशा स्थितीत या योजना पूर्ण करणे हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी कर्नाटक सरकारला दरवर्षी 53,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे.

काँग्रेसचे संपूर्ण लक्ष हे 5 आश्वासन पूर्ण करण्यावर आहे. त्यामुळे अनुभव असलेला मुख्यमंत्री निवडण्यावर काँग्रेसचे लक्ष होते. सिद्धरामय्या हे एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. योजना राबविण्यासाठी त्यांची ओळख आहे. अशा स्थितीत काँग्रेसने सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवली.

काँग्रेसचे 5 आश्वासन काय?

1- प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन.

2- पदवीधर बेरोजगारांना 3 हजार रुपये मासिक भत्ता आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना 1500 रुपये मासिक भत्ता.

3- प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला 2000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल.

4- प्रत्येक गरीब व्यक्तीला 10 किलो मोफत धान्य.

5- प्रत्येक महिलेला सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com