Bulk Drug Park In Maharashtra Saam TV
देश विदेश

Bulk Drug Park : महाराष्ट्रातील बल्क ड्रग पार्क दुसऱ्या राज्यात का गेला? राऊतांच्या प्रश्नाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Bulk Drug Park News: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ड्रग पार्क स्थापन होणार होते, मात्र अचानक माहिती मिळाली की हा बल्क ड्रग पार्क प्रोजेक्ट रद्द झाला.

Shivaji Kale

Bulk Drug Park News: महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ट्रक पार्क करण्याची योजना होती. ज्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची महाराष्ट्राचीसुद्धा पूर्ण तयारी होती. पार्लमेंटरी कमिटीमध्ये देखील यावर चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ड्रग पार्क स्थापन होणार होते, मात्र अचानक माहिती मिळाली की हा बल्क ड्रग पार्क प्रोजेक्ट रद्द झाला. महाराष्ट्रात येणारा हा प्रोजेक्ट रद्द का करण्यात आला असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. (Latest Marathi News)

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) या प्रश्नावर डॉक्टर मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, बल्क ड्रग पार्कचा (Bulk Drug Park ) उपयोग करून देशातील बल्क ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करणे हे गरजेचं आहे. या अगोदर राजकीय दृष्ट्या प्रोजेक्ट दिले जायचे आणि त्यानंतर त्यावर काम केलं जायचं. मात्र, प्रोजेक्ट कुठे दिलं पाहिजे यासाठी एक सूची तयार करण्यात आली होती.

ज्या ठिकाणी इकोसिस्टीम आणि व्यवस्थापन असेल अशा ठिकाणी या योजना देण्याचं ठरलं. या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच त्याचं डिटेल इव्होल्युशन करण्यासाठी कमिटी बनवण्यात आली. या इव्होल्युएशन नंतर सेक्रेटरी लेव्हलच्या कमिटीने यावर केलेल्या डिटेल डिस्कशन नंतर बल्क ड्रक पार्क कुठे दिलं पाहिजे यावर मेरिट वन, टू, थ्री तयार करण्यात आलं होतं आणि याच आधारावर ही योजना दिली गेली. (Breaking Marathi News)

हा कोणताही राजकीय निर्णय नव्हता. कोणत्याही ठिकाणची योजना रद्द केली गेली नाही. या योजनेसाठी त्या ठिकाणी क्लस्टर, उद्योग, मजुर, सामग्रीची उपलब्धता तसेच इकोसिस्टम तयार असणे अतिशय महत्वाचे आहे. अशा ठिकाणांसाठी एक मार्किंग सिस्टीम बनवण्यात आली होती आणि या मार्किंग सिस्टीमच्या आधारे ड्रग पार्कचे काम देण्यात आले आहे. मला अपेक्षा आहे की, तीन बल्क ड्रग पार्क बनवून देशाची गरज पूर्ण होईल आणि देशाला आयातीवर अवलंबून राहण्याची गरज कमी भासेल असं उत्तर मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Benefits: महागडे प्रोडक्ट सोडा; चेहऱ्याला लावा बटाटा

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

SCROLL FOR NEXT